आदिवासी विकास मंत्री ना.अशोक उईके यांच्या उपस्थितीत जिल्हा वार्षिक आदिवासी 2025 - 26 चा वार्षिक आरखडा मंजुरीसाठी बैठक संपन्न
चोपडा दि.७(प्रतिनिधी)जिल्हा वार्षिक आदिवासी 2025 - 26 चा वार्षिक आरखडा मंजुरीसाठीची बैठक ना. श्री नामदार अशोक उईके ( आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती .
या बैठकीस जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील ,जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन , आमदार अण्णासाहेब श्री प्रा .चंद्रकांत बळीराम सोनवणे , आमदार अमोल जी जावळे , सचिव विजय वाघमारे , उपसचिव वसावे ,जिल्हाधिकरी आयुष प्रसाद , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकितजी , जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे , प्रकल्प अधिकारी अरुण पवार आदी उपस्थित होते .
बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींनी वनविभाग , मागासवर्गीय कल्याण ,आरोग्य विभाग , महिला व बालविकास (पोषण आहार ) , लघु पाटबंधारे विभाग , विद्युत विभाग , मेडा (महाऊर्जा ) , रस्ते , शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद , क्रीडा व युवक कल्याण , कामगार ,कामगार कल्याण , पाणीपुरवठा व स्वच्छता या सर्व बाबींवर ३६ कोटी १९ लाख रुपये वाढीव निधी देण्यात यावा अशी मागणी केली.
यावेळी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सन २०१३ पासून रखडलेल्या कजाऀणे ३३ के. व्ही. उपकेंद्रासाठी निधीची तरतूद करावी ,कर्जाणे - धवली पुलासाठी निधीची तरतूद करावी,चोपडा येथे आदिवासी वस्तीगृहासाठी निधी मंजूर करावा,आदिवासी विद्यार्थ्यांना दजेदार व गुणवत्ता वाढीस चालना मिळण्यासाठी वैजापूर येथे एकलव्य इंग्रजी माध्यम शाळा मंजूर करावी,शबरी माता घरकुल योजनेचा इंष्टा़क वाढवून देण्यात यावा,तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली व वाढीव निधी देण्यात यावा यासाठी मागणी केली