पडसोद त्रिवेणी संगमावरील रामेश्वर महादेव मंदिरात..१५क्विंटल साबुदाणा खिचडी व ६ हजार ५००राजगिरा लाडूंचा महा प्रसादाचे आयोजन.. चोपडा आगारातर्फे ज्यादा बसेसची व्यवस्था
चोपडा,दि.२०(प्रतिनिधी )जळगाव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या पावन स्थळांमध्ये गणल्या जाणाऱ्या पडसोद येथील त्रिवेणी संगमावरील रामेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दिनांक 26/ 02 /2025 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपावेतो महा भंडाराचे आयोजन करण्यात आले आहे . भाविकांना मार्फत जवळपास 15 क्विंटल साबुदाण्याची खिचडी व चोपड्याचे दातृत्वशाली व्यक्तीमत्व लिलाधर गोविंदा देशमुख यांच्याकडून 6 हजार 500 राजगिऱ्याच्या लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे या देवदर्शनासाठी चोपडा आगारामार्फत चोपडा -संपुले विशेष बस गाड्या सोडण्यात येणार आहेत तेथून मोफत ट्रॅक्टरद्वारे भाविकांना नेण्यासाठी मंदिर समिती गावकऱ्यां मार्फत व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मंदिराचे सेवक हिम्मत बाविस्कर यांनी दिली आहे .
त्रेता युगात दंडकारण्याचा इथूनच प्रारंभ झाल्याचे नमूद असून या त्रिवेणी संगमावर भगवान प्रभू रामचंद्र ,सीतामाता व भगवान लक्ष्मण देव यांनी वनवास करताना मुक्काम ठोकलेला आहे. त्याच वेळी प्रभू रामचंद्र यांनी एका पिंडाची स्थापना तर भगवान लक्ष्मण देवाने दुसऱ्या पिंडाची स्थापना केलेली आहे त्यामुळे भारतात द्विपंड असलेले रामेश्वर महादेव हे एकमेव मंदिर आहे .याचा दाखला स्कंदपुराण व तापी महात्म्य या पौराणिक गाथेत नोंदविला गेला आहे त्या आधारावर पडसोद येथील त्रिवेणी संगमावर वसलेल्या या जागृत श्री रामेश्वर महादेव मंदिराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. या ठिकाणी भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीला भाविकांची अलोट गर्दी उसळते. तरी दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीला यावर्षीही भाविकांनी प्रचंड संख्येने भगवान शंकराचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.