महिलांनी सायबर गुन्ह्यापासून सावध राहावे:- श्री. हेमंत कोळी
चोपडा दि.३(प्रतिनिधी)कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यार्थी विकास विभाग व पंकज कला महाविद्यालय कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ,चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने युवती सभे अंतर्गत आत्मनिर्भर युवती अभियान या कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रो. आर आर अत्तरदे ,प्रमुख मार्गदर्शक पोलिस कॉन्स्टेबल श्री. हेमंत कोळी, विद्यार्थी विकास जिल्हा समन्वयक डॉ.संजय पाटील , विद्यार्थी विकास अधिकारी महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. नंदिनी वाघ ह्या होत्या. या कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना श्री. हेमंत कोळी यांनी सांगितले की सायबर गुन्हेगारीही नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक प्रमुख दुष्परिणाम आहे' जागतिक समस्या आहे. अशा गुन्यांत मोठ्या संख्येने महिला बळी पडतात.
मात्र अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कठोर कायदे करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. आयटी अॕक्ट 2000 (माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000) हा कायदा आपल्याकडे आहे. हॅकिंग, इंटरनेटवर अश्लिल गोष्टी व मजकुराचे प्रकाशन या गोष्टी गुन्हा मानण्यात आल्या आहेत. मात्र एकुणच महिलांच्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेता हा कायदा परिपूर्ण नाही, असेच म्हणावे लागेल. महिलांना सामना करावा लागत असलेले एकूण सायबर गुन्ह्यांपैकी मोठ्या संख्येने गुन्हे हे केवळ महिलांच्याच बाबतीत घडत असतात. या प्रकारे ई-मेलद्वारे होणारा छळ,सायबर स्टॉकिंग (Stalking) (सायबर विश्वातून होणारा पाठलाग),
सायबर पॉर्नोग्राफी (सायबर विश्वातून पसरविली जात असलेली अश्लिलता),सायबर डीफमेशन (बदनामी),मॉर्फिग (संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटवरील मजकूरामध्ये किंवा छायाचित्रांमध्ये फेरफार करणे),ई-मेलद्वारे होणारा छळ, ब्लॅकमेल करणे, धमकावणे, दंडेली करणे किंवा फसवणूक करणे इत्यादी प्रकारांचा या पद्धतीच्या छळवणुकीत समावेश होतो.
तसेच या कार्यक्रम चे अध्यक्ष प्रो. आर आर अत्तरदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले पत्रांद्वारे एखाद्याचा छळ करण्याप्रमाणेच हे आहे. मात्र बहुतेकवेळा बनावट खात्यांवरूनच असे ईमेल पाठविले जात असल्याने ते अधिक त्रासदायक असते.आधुनिक काळातील हा सर्वाधिक चर्चित सायबर गुन्हा म्हणावा लागेल. यामध्ये सातत्याने एखाद्यावर लक्ष ठेवले जाते किंवा त्याचा पाठलाग केला जातो. एखाद्या व्यक्तीला सातत्याने मेसेजेस पाठविणे, ईमेल्स पाठविणे किंवा तो वापरत असलेल्या चॅटरुममध्ये प्रवेश करणे इत्यादी प्रकारांनी त्या व्यक्तीच्या इंटरनेटवरील सर्व हालचालींवर पाळत ठेवली जाते. यापैकी काही मेसेज धमकीचेही असतात. महिलांना पुरुषांकडून तर लहान मुलांना लैंगिक अत्याचाराची प्रवृत्ती असलेल्यांकडून अशा प्रकारच्या स्टॉकिंगला सामोरे जावे लागते. बहुतेकदा इंटरनेटच्या दुनियेत नवीन असलेल्या आणि इंटरनेट सुरक्षिततेची माहिती नसलेल्यांना याचा सामना करावा लागतो.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालय चे प्राचार्य प्रो.आर.आर.अत्तरदे यांचे मार्गदर्शन लाभले. यां कार्यक्रमाच्या आयोजन करण्यासाठी प्रा दिलीप पाटील, डॉ नंदिनी वाघ व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. नंदिनी वाघ यांनी केले. तर आभार प्रा. रुपाली सोनार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.