आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी अमृत २.० योजनेतंर्गत २.६१ कोटींचा निधी उपलब्ध..जुन्या कनेक्शन धारकांना नवीन पाईप लाईनला नळ जोडणी कलेक्शन आता अगदी मोफत ..
♦️ रस्त्याची कामे प्रगतीपथावर असतांनाच त्वरित नळ जोडणी करण्याचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांचे आवाहन
चोपडा दि.११(प्रतिनिधी) चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या प्रयत्नांनी अमृत २.० योजनेतंर्गत 2.61 कोटी निधी चोपडा नगरपालिकेस उपलब्ध करून दिल्यामुळे शहरातील जुने नळ कनेक्शन असलेल्या रहिवाश्यांकडे कोणतीही फी न घेता फ्री मध्ये नगरपालिके मार्फत नवीन पाईप लाईनला नळ जोडणी कलेक्शन मोफत करून देण्यात येणार आहे . त्यासाठी मात्र घरपट्टी व पाणीपट्टी पूर्ण पणे भरलेली असावी अशी अट घालण्यात आली आहे . तरी या सुवर्ण संधीचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.
शहरभर पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने करोडो रुपयांची पाईप लाईन करण्यात आली आहे .मात्र या नवीन पाईप लाईनला नळ जोडणी कनेक्शनसाठी न.पा.ने ३ हजाराचे आसपास फी आकारलेली होती ती फी सर्व सामान्य जनतेला डोईजळ वाटत होती हे ध्यानी घेऊन आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे आता जुन्या नळ कनेक्शन धारकांसाठी या पाईप लाईनला जोडणी फ्री मध्ये करून मिळणार आहे त्यासाठी मात्र कनेक्शन धारकांची घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी पूर्णपणे भरलेली असणे आवश्यक आहे.नवीन नळ कनेक्शन धारकांसाठी ह्या संधीचा लाभ नसल्याचेही मुख्याधिकारी महोदयांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० योजनेअंतर्गत चोपडा शहरात सवलतीच्या दरात नळ कनेक्शन देण्याचे काम येत्या ५ ते ६ दिवसात सुरु होणार आहे. तरी नागरीकांनी नविन नळ कनेक्शन किंवा रि-कनेक्शन घेणे करीता सर्व घरपट्टी भरणे आवश्यक आहे. अन्यथा आपणास कनेक्शन घेता येणार नाही.
तसेच घरगुती नविन (Direct) नळ कनेक्शन (१५ मी.मी) करिता नळ जोडणी फी रु.१००० + अनामत रु.१८०० + चालू वर्षाची पाणीपट्टी,तर व्यवसायीक (Commercial) नविन नळ कनेक्शन (२५ मी.मी)नळ जोडणी फी रु.२००० + अनामत रु.७५०० + चालू वर्षाची पाणीपट्टी अशी रूपरेषा ठरविण्यात आली आहे.
तरी शहरवासीयांनी ज्या ठिकाणी नविन रस्त्याचे काम चालु आहे. तेथील नागरीकांनी त्वरित नळ कनेक्शन घेणे. अन्यथा रोड झाल्यावर नळ कनेक्शन घेण्याची मागणी केल्यास रोड रिस्टोरेशन किंवा रिपेरींग फी दंडासह वसुल करण्यात येईल. तसेच ज्यांच्याकडे अनधिकृत नळ असतील त्यांनी नगरपालिकेत पाणी पुरवठा विभागास भेट देऊन नळ कनेक्शन रेम्युलर करुन घेणे अन्यथा अनधिकृत नळधारका विरुध्द पाणीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. यांची नोंद घ्यावी. व नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी श्री.पाटील यांनी केले आहे.