भारतीय जैन संघटनाच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन..कँसर बाबत जन जागृती होने आवश्यक -- डॉ.योगिता काटे
चोपडा,दि.१० (प्रतिनिधी) -- भारतात कँसरचा बाधित रुग्ण आता सर्रास दिसायला लागले आहेत. जसे डायबिटीसचा रुग्ण आढळतात तसे केंसरचे रुग्ण दिसत आहे.आपली लाईफ स्टाईलचा परिणाम होय.आपल्या खाण्या पिण्याचा सवयी बदल्या नाही तर कँसर प्रत्येकाचा घरात येवून जाईल कँसर बाबत जनजागृती होणे आवश्यक आहे असे मौलिक प्रतिपादन डॉ. योगिता काटे यांनी भारतीय जैन संघटना चोपडा यांच्या वतीने कँसर दिन निमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमात ते बोलत होत्या.
येथील नगरवाचन मंदिरात 8 फेब्रु. रोजी घेतलेल्या भारतीय जैन संघटना शाखा चोपडा कँसर दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ सुश्राविका श्रीमती प्रेमलताजी टाटिया हे तर जिला अध्यक्ष निर्मलजी बोरा,जिला महासचिव
दर्शनजी देशलहरा,जिला सद्स्य अभयजी ब्रम्हेचा आदी उपस्थित होते. यावेळी त्या पुढे म्हणाले की, महिलामध्ये ब्रेस्ट कैंसर आणि सर्वाइकल कैंसरचा वाढते प्रमाण मृत्यू दर ला कमी करण्यासाठी डॉक्टर योगिता सचिन काटेनी कैंसरची प्राथमिक स्टेज निदान झाल्या पासून आजाराचे बरा होई पर्यंत चान्स जास्त असतात आणि ब्रेस्ट कैंसरला ब्रेस्टला कसे स्वतः चेक करून गांठ व इतर कैंसरचे लक्षण आहे का? हे कसे पाहावे आणि गाठ असली तर काय करावे. आणि सर्वाइकल
कैंसरची लक्षणं काय आहेत.वैक्सीनेशन ट्रिटमेंट काय आहे ते त्यांनी सविस्तर आणि सोप्या भाषेत सांगितले. यावेळी कँसर फायटर दहा महिलांचे स्वागत सुध्दा करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता बोथरा, अंजली बरडीया, तर नवकार मंत्र मयुरी कोचर, स्वागतगित दिव्या चोपडा, आभार प्रदर्शन पूनम राखेचा तर आभार प्रदर्शन यावेळी सौ.प्रभाजी राखेचा, सुशीला टाटीया,शंकूतला बरडीया, कांचन राखेचा यांचा सह समाजातील पुरुष जैन संघटनाचे जितेंद्र बोथरा, चेतन टाटीया यांच्या सह अनेक महिला हजर होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी
तालुका अध्यक्ष गौरव कोचर,शहर महिला अध्यक्ष माधुरी बरडीया, शहर सचिव मयंक बरडीया,महिला सचिव सरिता टाटिया, तसेच भारतीय जैन महिला,व पुरुष संघटनाच्या सदस्यांनी आदींनी मेहनत घेतली.