करोडपती माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक महोत्सव उत्साहात.. आदिवासी नृत्यासह विविध गीतांनी आणली बहार
चोपडा दि.१(प्रतिनिधी) येथील कै हि मो करोडपती माध्यमिक विद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सवात दिपनृत्य,शिवजन्मोत्सव, देशभक्ती,समूह नृत्य,विज्ञान लावणी,बहारदार आदिवासी नृत्य, विनोदी नाटिका,विविध भारतीय लोककलांनी रंगत आणली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक विजय हिरालाल करोडपती हे होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संस्थापक अध्यक्ष विठ्ठल ओंकार पाटील तर उदघाटन अध्यक्ष डॉ दिपक ओं पाटील यांनी केले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष डॉ अशोक ओंकार पाटील, सचिव पंकज बडगुजर, चेअरमन उमेश करोडपती, डॉ दिलीप ओंकार पाटील, आगार प्रमुख महेंद्र पाटील, माजी नगरसेविका संध्या महाजन, यांना गटशिक्षणाधिकारी अविनाश पाटील, केंद्रप्रमुख दिपक पाटील, संचालक सुभाष बडगुजर, बी डी साळुंखे, गोविंदा महाजन,शाम करोडपती,स्वाती बडगुजर,एन बी बडगुजर, डी व्ही बाविस्कर,पी एन पाटील हे होते.यावेळी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
अध्यक्ष डॉ दिपक पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात वाढ व्हावी तसेच स्पर्धा परीक्षाच्या बाबत जाणीव निर्माण व्हावी म्हणून संस्थाअंतर्गत ""सुंदर आई टॅलेंट सर्च"" परीक्षा घेण्यात आली. त्याचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मंगेश भोईटे यांनी केले. यावेळी चोपड्याचे आगारप्रमुख महेंद्र पाटील यांचे हिंदूह्रदय बाळासाहेब ठाकरे सुंदर, स्वच्छ बसस्थानक स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तसेच शहरात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल माजी नगरसेविका संध्या महाजन यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिपाली बडगुजर, शर्मिला बडगुजर यांनी केले. तर आभार प्रदर्शन वैशाली साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आर आर बडगुजर, ए पी बडगुजर, सी पी बडगुजर, पी सी बडगुजर,मिना पाटील,संजोग साळुंखे, भुषण सोनवणे, अशोक बडगुजर, सुनिल बडगुजर, विलास सनेर, गणेश बडगुजर यांनी सहकार्य केले.*