चोपडा येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत उत्तुंग भरारी
धुळे दि.१(प्रतिनिधी): दिनांक ०१/०२/२०२४ रोजी एफ झोन शहादा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा एस ई एस तंत्रनिकेतन वाडी भोकर, धुळे येथे पार पडली यात झालेल्या बास्केटबॉल, ॲथलेटिक 100 मीटर ,400 रिले, उंच उडी व भारोत्तोलन व गोळा फेक असे विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चोपडा येथील श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलीटेक्निक) चोपडा येथील 17 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविलेला होता यात बास्केटबॉल या स्पर्धेत गुणवंत सावळे, हर्षल भोई ,मयूर सुतार, दीपक बडगुजर ,यश अहिरे ,द्रोणाचार्य कोळी, मोहित माळी ,मयूर भोई, या विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक पटकावला व भारोत्तोलनात लोकेश महाले या विद्यार्थ्याने प्रथम पारितोषिक पटकवले , यामुळे विजय संघाच्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेण्याची वाट मोकळी झाली या सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष मा. भैयासाहेब अँड संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेचे सचिव मा. ताईसाहेब डॉ स्मिता संदीप पाटील व संस्थेचे प्राचार्य श्री व्ही एन बोरसे व प्राचार्य डॉक्टर एस पी अहिरराव तसेच सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सदरील स्पर्धेसाठी विद्युत विभागातून भूषण पवार व स्थापत्य विभागातून रोहित शिंदे यांनी परिश्रम घेतले.