पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता ( A I ) विषयावर कार्यशाळा...

 पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता ( A I ) विषयावर कार्यशाळा...

♦️शिक्षणात तंत्रज्ञानाची जोड अत्यंत आवश्यक... उमेश बाविस्कर...


चोपडा,दि.३( प्रतिनिधी):- शिक्षकांची जागा हळूहळू रोबोट घेत आहे.त्यामुळे प्रत्येकाने तंत्रज्ञान शिकण्याची वृत्ती ठेवावी. शिक्षणात तंत्रज्ञानाची जोड अत्यंत आवश्यक आहे. तंत्रज्ञान शिकण्याची व विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान शिकवण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींनीच शिक्षकी पेशा स्वीकारला पाहिजे. पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेमार्फत आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आधारित कार्यशाळेत उमेश बाविस्कर बोलत होते.

       ते पुढे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ताचा उपयोग शालेय जीवनात १००% करता येतो.आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्वतः शिकते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अमूर्त संकल्पना आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोध घेऊन चुका सुधारत असते. नवीन शैक्षणिक धोरण मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता चा उल्लेख आहे तसेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा मध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख आहे . आर्टिफिशल इंटेलिजन्स मुळे रोजगाराचे स्वरूप बदलेल पण रोजगार जातील असे काही वाटत नाही. मल्टी मीडिया मुळे मुलांचे दिर्घकाळ स्मरणात राहते.प्रॉम्प्ट ( संकेत ) जर काळजीपूर्वक दिलेत तर रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळतात.तसेच व्हॉट्सॲप मेटा , व्हिडिओ जनरेट , लेसन प्लॅन साठी चॅट जीपीटी , कॅनवा  इत्यादी बाबींचा शिक्षणात प्रभावी वापर करावा याचे मार्गदर्शन केले.

      पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले प्रास्ताविकात म्हणाले,

शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापराचे अनेक फायदे आहेत. परंतु, शिक्षक या नात्याने शिक्षणाच्या मूळ उद्देशाबाबतचा विचार केंद्रस्थानी ठेवावा लागेल. शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला गेला, तर अध्यापन आणि ज्ञानार्जनात व्यापक बदल होऊ शकतो. असे मत त्यांनी व्यक्त केले.

    सदर कार्यशाळेस संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे ,संचालक पंकज बोरोले  यांसह विभागप्रमुख प्रो.आर आर अत्तरदे, एम व्ही पाटील , व्ही आर पाटील,  मिलिंद पाटील , केतन माळी, मीना माळी तसेच सर्व विभागांचे शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने