लासुर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 लासुर येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

लासुर,ता.चोपडा दि.४(प्रतिनिधी) येथील सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला मंडळ तर्फे महिलांना शिक्षण प्रवाहात आणणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माजी ग्रामपंचायत सदस्या वैयजंताबाई बाविस्कर यांनी फुलहार अर्पण केला. तसेच माजी सरपंच देवीलाल बाविस्कर सर यांनी महिलांसाठी सावित्रीबाई फुले यांचे योगदान सती प्रथा, जरठ विवाह, दलितांसाठी केलेले कार्य व सत्यशोधक चळवळ याविषयी महिलांना माहिती दिली. सावित्रीबाईंच्या योगदानाचे कार्य समजून महिलांनी त्यांचे कार्य आत्मसात करून महापुरुषांचे विचार अंगीकारावे असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षा सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय मंडळाच्या अध्यक्षा विद्याबाई बाविस्कर या होत्या . सुरुवातीला सावित्रीबाईंची ओवी प्रमिला बाविस्कर, ज्योती करंदीकर व सलोनी पाटील यांनी म्हटल्या. कार्यक्रमाला पुनम पाटील, जिजाबाई पवार, रेखा बाविस्कर, योगिता म्हैसरे,  गीता बाविस्कर, मथुराबाई साळुंखे ,भूमी करंदीकर, लता बावीस्कर,अस्मिता करंदीकर, सुनीता बिऱ्हाडे गायत्री म्हैसरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी पाटील यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने