चोपडा पालीवाल महिला मंडळातर्फे हळद कुंकूसह विविध कार्यक्रम संपन्न

 चोपडा पालीवाल महिला मंडळातर्फे हळद कुंकूसह विविध कार्यक्रम संपन्न

चोपडा दि.३१(प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी रविवाररोजी पालीवाल समाज महिला मंडळातर्फे संक्रांती मिलन आणि  वान वाटपाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. चोपडा पालीवाल समाज महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी  सहभाग घेतला. पूजा, हळदी कुंकू आणि वान वाटपासह  सोसायटीतील मुलांनी संगीत खुर्ची, मजेदार खेळ आणि नृत्याचा मनापासून आनंद घेतला. .

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रांगोळी आणि दीपपूजन करण्यात आले. त्यानंतर सोसायटीतील उपस्थित असलेल्या सुना आणि मुलींनी एकमेकांना हळद आणि कुंकू लावला आणि पाणी वाटले.भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत  महिला मंडळाने राष्ट्रगीत गायले आणि वंदे मातरमचे नारेही दिले.

चोपडा पालीवाल समाज महिला मंडळाने आयोजित केलेल्या संक्रांती मिलन समारोहाच्या दुसऱ्या टप्प्यात  माता-भगिनींनी स्वादिष्ट नाश्त्याचा आस्वाद घेतला. त्या नंतर सर्व महिला गटातील सदस्यांसह मुलांनीही गरब्याच्या तालावर थिरकत गरबा नृत्याचा आनंद लुटला.  

कार्यक्रमाची सांगता माँ आशापूर्णादेवीची पूजा आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन करण्यात आली.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी  श्रीमती रेखा अजय पालीवाल, स्वाती पालीवाल, मोनल पालीवाल, श्रीमती सुनीता पालीवाल, शकुंतला पालीवाल, श्रीमती लक्ष्मी पालीवाल, अनिता पालीवाल, श्रीमती भावना पालीवाल यांनी परिश्रम घेतले.  श्रीमती किरण पालीवाल व श्रीमती सुमन पालीवाल  यांनी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने