तहसील कार्यलयाकडून आज गौण खनिजाचे ओव्हरलोड दोन ट्राला जप्त

 तहसील कार्यलयाकडून आज गौण खनिजाचे ओव्हरलोड दोन ट्राला जप्त 



चोपडादि.२४ ( प्रतिनिधी)--- तहसील कार्यलयाकडून आज गौण खनिजची रेतीचा ओव्हरलोड अवैध वाहतूक करतांना अकुलखेडा गावा जवळ फिरत्या पथकाने जप्त केले. 

 सविस्तर असे की, तहसील कार्यलयाकडून माहिती दिल्या वरून आज दि. 22 रोजी दुपारी फिरत्या पथकाने शिरपूर कडून  पाच- पाच ब्रासचे परमिट घेऊन  बारा टायरचा ट्राल्यात जवळपास दहा ब्रास रेतु भरलेली आढळली व दुसऱ्या ट्राल्यात जवळपास आठ ब्रास रेतु आढळल्याने  तो ट्राला जप्त करण्यात आले आहे. MH-19- CX- 2333 तर MH-19- EK- 5211 हे दोन ट्राला जप्त करण्यात आले. जवळपास साडेलाखाचा लाख रुपयाचा दंड आकारण्यात येईल. असे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. तसेच ट्राला वाहनाचा दंड प्रांत कार्यलयाकडून ठरविण्यात येईल असेही सांगण्यात आले. या कारवाईत प्रांत कार्यलयाचा आदेशावरून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार बी.आर.सैदाने नायब तहसीलदार सचिन भामंबडे यांच्या सह  गणेश महाजन (तलाठी -चोपडा शहर), पंकज बाविस्कर ( वड्री), अनंत माळी (मंगरूळ), सर्ववर तडवी (बिडगाव), हमीद पठाण (वेळोदे),संतोष कोळी (वढोदा), भूषण पाटील (धुपे),दीपाली ईशी (धनवाडी), कोतवाल जितेंद्र धनगर, दीपाली बाविस्कर हे सर्व कर्मचारी पथकात होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने