सी.बी निकुंभ विद्यालयाचा वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
चोपडा,दि.२४ ( प्रतिनिधी) तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी.बी निकुंभ माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, एस. एन. आर.जी.इंग्लिश मीडियम स्कूल व खाजगी आय.टी.आय या शाखांचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, सचिव जवरीलाल जैन, सहसचिव भानुदास पाटील, कुमुदिनी गुजराथी, भूपेंद्रभाई गुजराथी, उपसरपंच संतोष कोळी, जयवंत पाटील, रामकृष्ण शिंपी युवराज रजाळे, विनोद पाटील परिसरातील विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या निमित्ताने ऑल इंडिया इन्शुरन्स कंपनीद्वारे विम्याचे लाभार्थी विद्यार्थी ललित कोळी, खुशाल पाटील यांना वैद्यकीय खर्चाचा चेक देण्यात आला. एस.एस.सी परीक्षा मार्च- २०२४ वर्षाचे गुणवंत विद्यार्थी महेंद्र चौधरी, निकिता पाटील , हेमांगी जैन तसेच एच. एस.सी. फेब्रुवारी २०२४ वर्षाचे गायत्री कोळी, पूजा पारधी, कल्याणी शिरसाठ यांचा देणगीदारांकडून बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी देणगीदार वेळोदे येथील सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण शिंपी,शाळेतील परसबागसाठी ठिबक संच देणारे सिटी इंडिया न्यूजचे भटेश शिसोदे, माजी विद्यार्थी व मच्छिंद्र कोळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेत ट्रॉफी व गोल्ड मेडल प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शासनाच्या नवोपक्रम स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झालेले प्रा. आय. आर. राजपूत व महात्मा फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्रा. एस. पी. बि-हाडे यांचा सत्कार करण्यात आला. वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध रंगतदार, बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सी. बी. निकुंभ विद्यालय व एस. एन. आर. जी. च्या विद्यार्थ्यांनी सादर केले. देशभक्तीपर गीतावर नृत्य व ड्रामा, जोगवा नृत्य, आम्ही शिवकन्या नृत्य, प्रादेशिक नृत्य, आदिवासी नृत्य, शिवशंकर तांडव नृत्य, लावणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित कार्यक्रम अशा विविध बहारदार कार्यक्रमांनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.ए.पाठक, प्रा. एस. पी. बि-हाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. पी.चौधरी, पर्यवेक्षक व्ही.ए.नागपुरे, एस. एन. आर. जी इंग्लिश मिडीयमचे प्राचार्या जेनिफर साळुंके, आय.टी.आयचे प्राचार्य विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.