चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शौर्य दिवस साजरा

 चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शौर्य दिवस साजरा


 चोपडा,दि.१(प्रतिनिधी) येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने १जानेवारी २०२५ हा दिवस भीमा कोरेगाव येथील शूर वीर सैनिकांच्या मानवंदना देऊन शौर्य दिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे तसेच नगरसेवक अशोक बाविस्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नगरसेवक रमेशभाऊ शिंदे,संतोष अहिरे, सुदाम ईशी यांच्या हस्ते हार करून त्रिशरण पंचशील भीमस्मृती, भीमस्मरण घेऊन वंदना करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उभारलेल्या शौर्य दिवस विजय स्तंभाला वीरचक्र पीएसआय मधुकर साळवे व माजी सैनिक मेजर शालिग्राम करंदीकर यांच्या हस्ते वीरचक्र अर्पण करून शूरवीर सैनिकांना मानवंदना देण्यात आली.

    तसेच कार्यक्रमाला खास करून व्याख्याते प्राध्यापक आधार पानपाटील सर तसेच कुमारी करीना विजय शंभरकर, लिम्बिनी प्रवीण करनकाळ यांनी शौर्य दिनाबाबत महत्व विशद करून मनोगत व्यक्त केले.

    सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष भरत भीमराव शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बापूराव गिरधर वाणे,अशोक बाविस्कर, हितेंद्र मोरे, रमेश शिंदे, मेजर शालिग्राम करंदीकर,सुदाम ईशी,जानकीराम सपकाळे, सुदाम करनकाळ,रमेश सोनवणे, संतोष अहिरे,संजय अहिरे, समाधान सपकाळे, छोटूभाऊ वारडे,संजय साळुंखे,देवानंद वाघ,रवींद्र वाडे,अनिल वाडे,प्रवीण करणकाळ,अनिता बाविस्कर, तसेच निळे निशाण संघटनेचे पदाधिकारी, उपस्थित होते.शेवटी कार्यक्रमाचे आभार तालुका अध्यक्ष बापूराव गिरधर वाणे यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने