चोपडा महाविद्यालयातर्फे गांधी तीर्थ जळगाव येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन

 चोपडा महाविद्यालयातर्फे गांधी तीर्थ जळगाव येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन

चोपडा,दि.१(प्रतिनिधी): महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय चोपडा येथील महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र विभाग तसेच इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी तीर्थ, जळगाव येथे 'एक दिवसीय अभ्यास दौऱ्याचे' आयोजन दि.२८ डिसेंबर २०२४  रोजी करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव स्मिताताई संदीप पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के. एन.सोनवणे, उपप्राचार्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एस.पी.पाटील, पर्यवेक्षक श्री.ए.एन. बोरसे, समन्वयक श्री. पी.एस.पाडवी यांनी अभ्यास दौऱ्यात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

       महात्मा गांधी एक व्यक्ती नसून एक विचार आहेत. आजच्या जगात भौतिकवाद व चंगळवाद बळकावला असताना महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाचा आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, गांधीजींच्या समग्र जीवन तत्वज्ञानाचा अभ्यास व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये महात्मा गांधी विचारांद्वारे नैतिक मूल्यांची स्थापना होऊन सुजाण नागरिकांची निर्मिती व्हावी या उद्देशाने या शैक्षणिक दौऱ्याच्या आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यासाठी महाविद्यालयातील एकूण १९ मुले व ३६ मुली असे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयालयातील म्हणून ५५ विद्यार्थी या अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते. या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी गांधी तीर्थ येथील ऑडिओ व्हिडिओ चित्रीकरणातून साकारलेल्या गांधीजींच्या जीवन प्रवासाबाबत तसेच महात्मा गांधीजींच्या बालपणापासून तर गांधीजींच्या जीवनातील विविध प्रसंग, स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान याविषयी विद्यार्थ्यांनी  माहिती जाणून घेतली. महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या चंपारण्य सत्याग्रहापासून तर त्यांच्या छोडो भारत आंदोलनापर्यंत तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या प्रसंगी गांधीजींचे योगदान याविषयी समग्र माहिती याठिकाणी विद्यार्थ्याना देण्यात आली.

      या अभ्यास दौऱ्याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्रप्रमुख श्रीमती एस. बी.पाटील, श्रीमती पी.एन.पुन्नासे, श्री. व्ही.डी.शिंदे,  श्री.व्ही.बी.पाटील,श्री.एन.बी. पाटील आदि सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने