प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सातव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांना दिमाखदार सुरुवात
चोपडा,दि.६ (प्रतिनिधी) : येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या शतकोत्तर सातव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांचे दिमाखदार उद्घाटन दि 6 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल यांच्या शुभहस्ते संस्थेचे ध्वजारोहण आणि एन सी सी च्या ९० कॅडेट यांनी रोहन पाटील सर, श्रीमती जे आर बडगुजर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकुमार मधुकर मगरे या विद्यार्थ्याच्या हस्ते ज्योत प्रज्वलन करून संपन्न झाले. संस्थेच्या परंपरेप्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा देखील सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. यात एम आर पाटील, एम बी चौधरी, ए जी कुलकर्णी, भाऊसाहेब पी पी पाटील, सुनील भाऊ गुजराथी तसेच शिपाई बंधू अमृतभाऊ पारधी यांचा सहपत्नीक तर दिवंगत तांमराज सोनवणे सर व राजूभाऊ पाटील यांच्या वारसांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक पी एस गुजराथी यांनी शाळेच्या यशस्वी निकालाचा आढावा घेतला. वर्षभरात विविध वकृत्व, निबंध, कला, क्रीडा, विज्ञान, शिष्यवृत्ती परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा त्यांनी गौरव केला. सौ पी ए गुजराथी यांना रोटरी तर्फे नेशन बिल्डर अवार्ड , पी पी शिंदे यांना स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व मंत्रालय समन्वय समिती मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तर व्ही ए गोसावी यांना उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक , सौ वाय ए बोरसे तसेच तुषार लोहार सर यांची कविता प्रसारित झाल्याबद्दल मुख्याध्यापकांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी पुनम गजानन जाधव हिने राज्यस्तरीय हातोडा फेक स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावल्या बद्दल तिचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गावातील विभागाच्या विद्यार्थ्यांनी एन एन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नयनरम्य लेझीम प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
सायंकाळी ४.०० वा इंग्लिश मिडियम स्कूल या विभागाचे *उडान* या शीर्षकावरील रंगारंग असे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. एन सी सी च्या उत्कृष्ट संचलनाबद्दल त्यांना योगेश मयूर यांनी दहा हजार तर लेझिम पथक व बँड पथक यांना डी टी महाजन यांनी दोन हजार रुपये देणगी म्हणुन बक्षीस दिले.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, सचिव माधुरीताई मयूर, कार्यकारणी सदस्य चंद्रहासभाई गुजराथी ,किरणभाई गुजराथी, प्रविणभाई गुजराथी, रमेशकाका जैन, योगीभाई मयूर, मुख्याध्यापक प्रशांतभाई गुजराथी , उपमुख्याध्यापक पी डी पाटील, जुनिअर कॉलेजचे उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षक एस एस पाटील, ए एन भट ,सर्व आजी-माजी मुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक व संस्थेच्या विविध ज्ञान शाखांचे पदाधिकारी,शिक्षक बंधू भगिनी आणि लेखनिक कर्मचारी बंधू,समन्वयक गोविंद गुजराथी, डी टी महाजन, पालक बंधू आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे ईशस्तवन पी बी कोळी, पंकज नागपुरे आणि त्यांच्या समूहाने सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एजाज शेख आणि पंकज शिंदे यांनी पार पाडले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका माधुरी पाटील यांनी केले.