नाशिक येथे पत्रकार श्रीकांत नेवे राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित
चोपडा दि.६(प्रतिनिधी)- येथील जेष्ठ पत्रकार श्रीकांत नेवे यांना नाशिक येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे सामाजिक,सहकार व पत्रकारीता क्षेत्रात समाजोपयोगी कार्याबद्दल राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार भाजप प्रवक्ते अजित चव्हाण, लक्ष्मण सावजी,नाशिक रोटरी क्लब अध्यक्ष ओमप्रकाश रावत,मॅाडेल व मिसेस मलेशिया इंटरनॅशनल डॅा.ज्योती केदारे शिंदे यांच्या हस्ते देवून एका कार्यक्रमात सन्मानित केले.
श्रीकांत नेवे हे गेल्या ३८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.तसेच विविध संस्थाच्या माध्यमातून सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत.
यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॅा.महेंद्र देशपांडे,अध्यक्षा कृतिका देशपांडे मराठे,म.वि.प्र.समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितिन ठाकरे,गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारती चव्हाण,राजस कंस्ट्रक्शनचे राजेश उपासनी,उत्तर महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी निशिगंधा कापडनीस आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.अनेकांनी यानिमित्ताने नेवे यांचे अभिनंदन केले आहे.