जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वराड येथे प्रजासत्ताक दिन साजरा

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वराड येथे प्रजासत्ताक दिन साजरा 


चोपडा दि.२७(प्रतिनिधी)76 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.त्यानंतर ध्वजारोहण शा.व्य.समिती अध्यक्ष अनिताताई शांताराम कोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत व ध्वजगीत घेण्यात आले.यानिमित्त  विद्यार्थ्यांचे लेझीम कवायत, देशभक्तीपर गीतांवर डान्स, वकृत्व स्पर्धा, रांगोळी व चित्रकला स्पर्धा असे अनेक उपक्रम घेण्यात आले. 

याप्रसंगी गावचे सरपंच अजयभाऊ गवळी, उपसरपंच वेणूताई  जगदेव, पो.पा.राजेंद्र गवळी तसेच शा.व्य.समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,गावातील ग्रामस्थ,पालक वर्ग, विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षक वृंद वराड मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कार्यक्रमांचे ग्रामस्थांनी कौतुक केले.सूत्रसंचलन देवानंद वाघ यांनी केले व आभार संजय साळुंखे यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने