वायुसेनाचे माजी सीएनसीओ जितेंद्र दीक्षित यांचे 26 जानेवारी रोजी देशसेवेसंदर्भात मार्गदर्शन
-----------------------
चोपडा दि.२७(प्रतिनिधी) - भगिनी मंडळ, चोपडा संचलित,ललित कला केंद्र, चोपडा येथे एअर फोर्सच्या माजी सीएनसीओ सिनियर नॉन कमिशनर ऑफिसर श्री.जितेंद्र दीक्षित(कानपूर) यांच्या हस्ते स्पंदन 26 जानेवारी विशेषशांक भित्तिपत्रकाचे अनावरण झाले. हे पत्रक विद्यार्थ्यांच्या स्व हस्तलिखित आपले विचार, कविता, चारोळी, चित्रांद्वारे सजवलेले असते. चित्रकलेवर आपले प्रेम व्यक्त करत श्री. जितेंद्र दीक्षित यांनी देशसेवेचा उजाळा करून दिला. आम्ही काय होते - काय आहोत व काय असू हे सांगत ते म्हणाले की, श्रद्धा प्रेम समर्पण आणि विश्वास यावर आम्ही जगत आहोत. विश्वशांतीच्या प्रवासावर 5000 वर्षापासूनचा आमचा इतिहास आहे. आम्ही कोणाला छेडलेले नाही आणि कोणी आम्हाला छेडले तर आम्ही त्याला दुसऱ्यांदा छेडण्या लायक सोडले नाही. दुश्मनसाठी आम्ही जबाब आहोत तर मित्रांसाठी सुस्वागतम चे गीत आहोत. जगा आणि जगू द्या. या सिद्धांतवादी आम्ही आहोत.
एअर फोर्स बाबत ते म्हणाले की, ही सेना अशी आहे जी दिसत नाही. या सेनेच्या फार मोठ्या सहकार्याने आम्ही युद्ध जिंकत असतो. 1999 च्या कारगिल युद्धात व 2002 च्या युद्धात त्यांचा सहभाग होता. वीस वर्षसेनेत काम केल्यानंतर ते सरळ चोपडा येथेच बँक ऑफ बडोदा येथे कॅशियर म्हणून नियुक्त झाले.
आपल्या विशेष शेरोशायरी च्या अंदाजात त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे देशसेवा कशी करता येते हे पटवून दिले.
चित्रकला ही सगळ्या कलांची राणी असून तिला कोणत्याही भाषेची गरज भासत नाही. ती दृश्य स्वरूपात अदृश्य काम करत असते. ती आपल्याला शिकवते पण तिला शब्द आणि भाषा नसते.
या वेळी प्रमोद वारुळे, मोहिनी जाधव, युवराज माळी या विद्यार्थ्यांची चित्रे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात निवड झाली त्याबद्दल त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सागर नाथबुवा यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. संजय नेवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला . आभार प्रदर्शन संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूनमबेन आशिषलाल गुजराथी यांनी केले.
ललित कला केंद्राचे प्राचार्य सुनील बारी, प्रा. विनोद पाटील,श्री. भगवान बारी, अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी व समस्त विद्यार्थी परिवार व इनरव्हील क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या .