चोपडा येथील शिक्षणशास्त्र विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 चोपडा येथील शिक्षणशास्त्र विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

चोपडा,दि.४(प्रतिनिधी): महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शिक्षणशास्त्र विद्यालयातर्फे  'सावित्रीबाई फुले जयंती' साजरी करण्यात आली.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा.एस.एम.खैरनार यांनी विद्यार्थ्याना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर  मार्गदर्शन केले.त्यांनी यावेळी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी तसेच पुनर्विवाह, बालविवाह रोखण्यासाठी केलेल्या कार्याचा परिचय करून दिला. 

     या कार्यक्रमाप्रसंगी छात्राअध्यापिका दिव्या सुरेश कोळी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रम प्रसंगी छात्राअध्यापिका प्रेरणा ढीवरे यांनी प्रास्ताविक केले.या कार्यक्रमात छात्राअध्यापिका पायल ठाकरे व गायत्री धनगर यांनी गीताचे सादरीकरण केले.कार्यक्रमात छात्राअध्यापिका स्वाती मोरे, जयश्री चौधरी,स्वाती बाविस्कर, रोशनी शिरसाठ, चैताली शेटे, पुष्पा पाटील,राधिका बारेला,रोहिणी भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

    या कार्यक्रमाचे आभार  मुस्कान तडवी या छात्राध्यापिकेने मानले.या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.विशाल बी. पाटील, प्रा.प्रियंका जी. पाटील, प्रा.संगीता बी.सोनवणे, प्रा.सुनीता बी.चव्हाण. आदि उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने