चोपडा महाविद्यालयात 'पाच दिवसीय मिशन साहसी अभियान कार्यक्रम' यशस्वीरित्या संपन्न

 चोपडा महाविद्यालयात 'पाच दिवसीय मिशन साहसी अभियान कार्यक्रम' यशस्वीरित्या संपन्न

चोपडा,दि.४(प्रतिनिधी): महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे   दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय चोपडा येथील विद्यार्थी विकास विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० डिसेंबर २०२४ ते ०३ जानेवारी २०२५ या दरम्यान युवतीसभे अंतर्गत 'मिशन साहसी अभियान कार्यक्रम' राबवण्यात आला. यात महाविद्यालयातील विद्यार्थिनींना पाच दिवस दररोज दोन तास स्वरक्षणार्थ कराटेचे प्रशिक्षण आत्माराम बावीस्कर यांनी दिले. 

    या कार्यक्रमाचा समारोप सोहळा दि.०३ जाने.२०२५ रोजी उत्साहात पार पडला. या समारोप कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थिनींनी पाच दिवसात घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रभावी प्रात्यक्षिक करून दाखवले. 

      सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. सौ.स्मिताताई संदीप पाटील  यांचे मार्गदर्शन लाभले. 

       या कार्यकमाच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते व प्रमुख वक्ते म्हणून चोपडा शहरातील रेडिओलॉजिस्ट डॉ. सौ.योगिता काटे  व आयुर्वेद तज्ञ डॉ.सौ. प्राजक्ता महाले तसेच उदघाटक म्हणून जळगाव जिल्हा समन्वयक,  विद्यार्थी विकास विभाग, कबचौ उमवि जळगाव डॉ.संजय काशिनाथ पाटील आणि प्रमुख अतिथी उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे, उपप्राचार्य डॉ.ए.बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागूल, समन्वयक डॉ. एस.ए.वाघ,  विद्यार्थी विकास अधिकारी        डॉ.डी.डी.कर्दपवार, सहा. विद्यार्थी विकास अधिकारी व युवतीसभा प्रमुख सौ.प्रीती रावतोळे, डॉ. आर.आर.पाटील,  अंतर्गत तक्रार समिती प्रमुख सौ.एम.टी. शिंदे आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. 

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवतीसभा प्रमुख डॉ. सौ. प्रीती रावतोळे यांनी केले. विद्यार्थिनींचा  आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी युवतींचे मानसिक व शारिरीक  आरोग्य उत्तम असणे  गरजेचे आहे त्यामुळेच व्यक्तिमत्वाचा विकास होवू शकतो म्हणून मेडिकल क्षेत्रातिल एक्स्पर्टस त्यात  रेडिओलॉजिस्ट डॉ.सौ. योगिता काटे  व आयुर्वेद तज्ञ डॉ.सौ प्राजक्ता महाले यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थिनिंनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले.  यामध्ये महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. वक्त्याचा  परिचय सौ.आरती बी. पाटील यांनी करून दिला.

   त्यानंतर कार्यक्रमाचे उदघाटक कबचौ उमवि, जळगाव विद्यार्थी विकास विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ.संजय काशिनाथ  पाटील यांनी मिशन साहसी अभियान यशस्वी पणे राबविल्याबद्दल आयोजकांचे व सहभागी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले.

  यावेळी प्रमुख वक्त्या डॉ.सौ. योगिता  काटे यांनी स्तन कॅन्सर याविषयी विद्यार्थिनीना मार्गदर्शन केले.तसेच तसेच वक्त्या डॉ. सौ प्राजक्ता महाले यांनी विद्यार्थिनींना युवतींच्या  निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली याविषयी  मार्गदर्शन करताना सांगितले की पारंपरिक आहार आधीही बदलू नये.भारतीय संस्कृती उत्तम असून तीच आपण जोपासायला हवी. त्यातील आहार, विहार, जीवनशैली हीच आपल्याला चांगले मानसिक व शारीरिक आरोग्य प्रदान करू शकते.  त्याचप्रमाणे या सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनी निलक्षी चौधरी ह्या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले.

   यावेळी प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी सर यांनी अध्यक्षीय मनोगतात सदर कार्यक्रम मुलींच्या सक्षमीकरणसाठी अतिशय फायदेशीर आहेत व मुलीनी त्याचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे असे आवाहन केले. तसेच या पाच दिवशीय मिशन साहसी कार्यशाळेसाठी विद्यार्थिनींना विविध प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक श्री आत्माराम बाविस्कर यांनी देखील मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. 

   या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. सौ. क्रांती क्षीरसागर व  सौ. सुनीता बी. पाटील यांनी केले तर आभार कु. वैशाली सोनगिरे व सौ. हर्षा देवरे यांनी मानले.  

   सदर कार्यक्रमासाठी  डॉ. सौ. क्रांती क्षीरसागर, सौ. रजनी जैसवाल, डॉ. सौ.संगीता पाटील, पूजा पाटील, निशा पाटील, दर्शन पाटील, रवी पाटील,  सुधाकर बावीस्कर, नीलेश भाट, जितेंद्र कोळी,  विशाल पाटील, भैय्या पारधी   यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी डॉ. एस.आर. पाटील, सौ.अनीता सांगोरे, सौ. अश्विनी जाधव, कीर्ती अग्रवाल,  स्नेहल शिंदे, अंजली पाटील, योगिनी पाटील, भाविका  गुजराथी आदि प्राध्यापिका उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने