हिमाचल प्रदेशच्या CSIR-IHBT मध्ये इलेक्ट्रोहोमिओपॅथी औषधांवर वैज्ञानिक कार्यक्रम संपन्न..महाराष्ट्रातिल जळगाव जिल्ह्याचे डॉ. पालीवाल झाले संमिलित
चोपडा दि.२७(प्रतिनिधी)CSIR-IHBT, पालमपूर, हिमाचल प्रदेश येथे दिनाक 17 ते 19 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रधान शास्त्रज्ञ डॉ. व्ही.के. अग्निहोत्री, यांच्या समन्वय आणि मार्गदर्शनाखाली "गुणवत्ता नियंत्रण, मानकीकरण आणि इलेक्ट्रोहोमिओपॅथिक औषधांचा वनस्पति अभ्यास" या विषयावर तीन दिवसांचा भारताचा चौथा नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन CSIR-IHBT चे संचालक आदरणीय डॉ. एस.के. यादव यांनी केले. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.व्ही.के. अग्निहोत्री यांचे अनालिटीकल वर्क, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. योगेंद्र एस. पडवड यांचे इन-विट्रो, इन-व्हिव्हो, टॉक्सिसिटी आणि सेफ्टी अभ्यास, प्रधान शास्त्रज्ञ डॉ. आशिष वरघाट यांचे सहाय्यक पीएचडी अभ्यासक आशिष कुमार यांचे हायड्रोपोनिक आणि एरोपोनिक तंत्रज्ञान, प्रमुख शास्त्रज्ञ सरिता मॅडम यांचे किण्वन तंत्रज्ञान,तसेच श्री रामकुमार यांचं ए.ए.एस., प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.अमित चावला यांनी पश्चिम हिमालयात आढडणाऱ्या इलेक्ट्रो होमिओपॅथी वनस्पती आणि अभ्यासाबाबत, डॉ.ओमप्रकाश यांनी वनस्पती ओळख कशी करू शकता असे विविध व्याख्यान व प्रशिक्षण देण्यात आले व त्याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे समन्वयक झारखंड येथील डॉ.एच.के. झा यांचा हस्ते संचालक डॉ. एस. के. यादव आणि डॉ.अमित चावला , महाराष्ट्रातील डॉ.विशाल आर.पालीवाल यांचा हस्ते प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.योगेंद्र पडवाड, बिहारचे डॉ.राकेश मोहन यांचा हस्ते डॉ.व्ही.के.अग्निहोत्री यांचा, म.प्र.च्या श्रीमती बागुल यांच्या हस्ते शास्त्रज्ञ डॉ.सरिता यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. भारतातील विविध राज्यांतील इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सकानी या कार्यक्रमात प्रशिक्षण घेतले. हरियाणातील डॉ. एस. एस. यादव, बिहारचे डॉ.मनिषकुमार मिश्रा, डॉ.अमरदीप सिंग, डॉ.पंखुरी आर्य, मध्य प्रदेशाचे डॉ.मुकेश बागुल, महाराष्ट्राचे डॉ.सुधीर आंबेकर, डॉ.एन. डी. पोलवार, टी. तेलंगणाचे श्री हरि सहभागी झाले होते. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर विविध राज्यातील सर्व इलेक्ट्रो होमिओपॅथिक चिकित्सकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. सर्व इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांच्या वतीने डॉ. विशाल आर. पालीवाल यांनी आभार व्यक्त केले.