चोपडा महाविद्यालयात "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रमांतर्गत 'भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे' आयोजन
चोपडा दि.२९(प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग व चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सदर उपक्रमांतर्गत दि. ३० व ३१ डिसें. २०२४ रोजी ग्रंथालयात सकाळी ०९ ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी व पालकांसाठी 'भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे' आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी भेट देऊन ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. ए.सूर्यवंशी तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल, उपप्राचार्य डॉ. ए.बी.सूर्यवंशी व समन्वयक डॉ.एस.ए.वाघ यांनी केले आहे.