आजपासून नगर वाचन मंदिराची ५५ वी शारदीय व्याख्यानमाला,पाच व्याख्याने रंगणार
चोपडा,दि.२९(प्रतिनिधी) - येथील शतकोत्तर वाटचाल करणारे नगर वाचन मंदिराची ५५ वी शारदीय व्याख्यानमाला आज दि.३० डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान पार पडणार आहे.
या व्याख्यानमालेला दि.३० रोजी गोविंद महाराज गायकवाड(देवाची आळंदी) यांचे "विनोदातून समाज प्रबोधन"यावर व्याख्यान होईल.तर दि.३१ रोजी ह.भ.प.पुरूषोत्तम उपाख्य विलास बुवा गरवारे(सातारा) हे "संत सावता माळी व संतजन" याबद्दल बोलतील.दि.१ जानेवारी रोजी डॅा.तात्याराव लहाने (मुंबई) यांचे "मी कसा घडलो" याविषयी व्याख्यान होईल.दि.२ ला चंद्रशेखर टिळक (मुंबई)हे "असेही काश्मिर" यावर बोलणार आहेत.दि.३ जानेवारी रोजी गणेश शिंदे(पुणे) यांचे "जीवन सुंदर आहे" ह्या विषयावर व्याख्यान होईल.
रोज रात्री ९ वाजता गांधी चौकात होणा-या व्याख्यानमालेला रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी,उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुळकर्णी,कार्यवाह गोविंद गुजराथी,डॅा.परेश टिल्लू व संचालक मंडळाने केले आहे.