जसाणे येथील मनोरुग्ण वैशाली कोळी पोहचली घरी .. जागरूक नागरिकांची अशीही जागरूकता
शिंदखेडा,दि.२९(प्रतिनिधी) तालुक्यातील जसाणे येथील मनोरुग्ण वैशाली अर्जुन पवार (कोळी) हि महिला २८ डींसेबर ला सकाळ पासून शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे गावात फिरत होती, संध्याकाळी ग्रामस्थांनी पोलीस पाटील अनिल पावरा यांना बोलावून घेतल्या नंतर पावरा यांनी नाव व गाव विचारले पण काहिच उत्तर न देता वैशाली लांब जात होती मग पाटील यांनी व्हाटस् ॲप ग्रुप ला बातमी पण व्हायरल केली, परत विश्वासात घेऊन विचारले असता तिने नाव वैशाली अर्जुन पवार (कोळी )गाव जसाणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे असे सांगीतले, कोळी समाजातील असल्याने गावातील संजय सोनवणे, सतीश ईशि, गोरख कोळी, यांना पावरा यांनी बोलवले व रंजाणे येथील सध्या गदडदेव येथे वास्तव्यास असलेले रविभाऊ शिरसाठ (पत्रकार) यांनाही बोराडी हुन व जसाणे हुन निलेश पवार, राघव पवार यांचाही फोन आला, रविभाऊ स्वता बोराडीला जाऊन संजय सोनवणे यांच्या घरी आहे म्हणून शहानिशा करून व पोलीस पाटील अनिल पावरा यांना भेटून परत रात्री उशिराने घरी आले, आज २९ डीसेंबर ला सकाळी १० वाजता वैशाली हिला तिचेच बहिनाचा मुलगा शुभम कैलास कोळी भामपुर तालुका शिरपूर येथे घेऊन गेले
या वेळी श्री.अनिल सुभाष पावरा (पोलीस पाटील बोराडी) श्री. विजय भावसिंग पावरा (ग्राम सुरक्षा दल सदस्य) श्री.बबन पाटील (ग्रामपंचायत सदस्य) श्री.संजय सोनवणे(कोळी)श्री. सतिश ईशि (कोळी) श्री.रविभाऊ शिरसाठ, श्री.गोरख कोळी (न्यु बोराडी) उपस्थित होते