चोपडा सी टी ई टी, टी ई टी, नेट उत्तीर्ण आणि पी एच डी प्राप्त व प्रवेशित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 चोपडा सी टी ई टी, टी ई टी, नेट उत्तीर्ण आणि पी एच डी प्राप्त व प्रवेशित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चोपडा दि.२१(प्रतिनिधी)येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात रविवार दि. 22 रोजी दुपारी सी टी ई टी, टी ई टी, नेट उत्तीर्ण आणि पी एच डी प्राप्त व प्रवेशित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विशेष संपादणुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा व एक अपत्य मुलगी असणाऱ्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला . 

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी सोनवणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश व आतापर्यंत महाविद्यालयाची झालेली वाटचाल याविषयीचा आढावा घेतला.सर्वप्रथम सरस्वती पूजन व गणित दिवसाचे औचित्य साधत श्री रामानुजन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.बी एड प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर केले. तर द्वितीय वर्ष प्रवेशित विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चोपडे शिक्षण मंडळाच्या सचिव माधुरी मयूर या होत्या. अध्यक्षीय भाषणामध्ये सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये विद्यार्थी शिक्षकांनी व सर्वांनीच अद्यावत राहणे आवश्यक आहे, आपल्या ज्ञानामध्ये सातत्याने वाढ करणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगामध्ये शिक्षकांसमोर विविध आव्हाने उभी राहणार आहेत तर त्या सर्व आव्हानांना तत्परतेने तोंड देण्यासाठी सक्षम बनण्याची गरज व्यक्त केली. सर्व सत्कारार्थी आजी-माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्वप्रथम विशेष संपादणूक असणाऱ्यांमध्ये रसिका दामोदर नेवे, अथर्व तुषार लोहार ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक शामराव पाटील, गौरव प्रकाश महाले व एक अपत्य मुलगी असणाऱ्यांमध्ये प्रीती आशिष गुजराथी व शरद दगडू पाटील याचा सत्कार करण्यात आला. पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये डॉ.शेख अझर व डॉ.ललित पाटील तर पीएचडी प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संजय बारी, गोपाल वाघ , योगिता पाटील,संदीप पाटील व मोहिनी पाटील या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सी. टी. ई. टी,टी.ई.टी. ,सेट, नेट परीक्षेत पास झालेले व उच्च शिक्षणात प्रवेशित झालेले अशा एकूण 40 विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा महाविद्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सविता जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी आय क्यू ए.सी समिती सदस्य गोविंदभाई गुजराथी, इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य रजिश बालन, समन्वयक प्रा. एन.डी .वाल्हे, माजी प्राचार्य एम पी.पाटील, मुख्य लिपिक शरद पाटील, कनिष्ठ लिपिक आशिष शहा, नाईक संजय पाटील, शिक्षकेतर कर्मचारी चंपालाल बारेला ,भूषण कोळी , राहुल पाटील ,श्री वली या सर्वांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने