डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने मराठा सेवा संघाच्या वतीने अभिवादन सभा संपन्न

 डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने मराठा सेवा संघाच्या वतीने अभिवादन सभा संपन्न

  अमळनेर (प्रतिनिधी) :- आज स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती निमित्त मराठा सेवा संघ, अमळनेर च्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन धनदाई महाविद्यालय यशवंत हाँल,सभागृहात करण्यात आले. 

यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे मा.राज्याध्यक्ष प्रा.डॉ. विलास पाटील यांनी डॉ .पंजाबराव देशमुख यांच्या कार्याची  गौरवशाली माहिती विशद केली.त्यांचा जीवन परिचय करत भाऊसाहेबांच्या धार्मिक व सामाजिक सुधारणा कार्याचा आढावा घेऊन शैक्षणिक कार्याची ओळख करून दिली. शिक्षक संघटना, देवस्थानांचे राष्ट्रीयकरण, मराठा शिक्षण परिषद, कुणबी आरक्षण या प्रश्नांना देखील भाऊसाहेबांनी हात कशा पद्धतीने घातला यावर मार्गदर्शन केले.यावेळी मराठा सेवा संघाचे पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष शिवश्री कैलास पाटील यांनी अमळनेर तालुका नुतन कार्यकारिणी गठीत केली.यात शिवश्री अशोक पाटील यांची तालुकाध्यक्ष पदी तर शिवश्री बापूराव पाटील( ठाकरे) यांची  तालुका सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.तसेच कार्याध्यक्ष पदी महेश पाटील, उपाध्यक्ष पदी निंबाजी पाटील, योगेश भदाणे.तसेच प्रसिध्दी प्रमुख पदी पत्रकार उमेश काटे, शहराध्यक्ष पदी डॉ. कुणाल पवार यांची नेमणूक करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा.अशोक पवार सर यांनी भूषविले. या प्रसंगी श्रीकांत चिखलोदकर,आबासो विश्वास पाटील, शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे,उद्योजक प्रशांत निकम,डी ए पाटील , विजय पाटील, हिरालाल पाटील, विनोद पाटील, खेमचंद्र पाटील, अजिंक्य चिखलोदकर, हर्षल खैरनार आदी  उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमराज पवार यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने