विवेकानंद विद्यालयाची स्वरा विनित हरताळकर हिची इस्रो येथे भारत सरकार अंतरिक्ष विभागातील अभ्यास सहल संपन्न

 विवेकानंद विद्यालयाची स्वरा विनित हरताळकर हिची इस्रो येथे भारत सरकार अंतरिक्ष विभागातील अभ्यास सहल संपन्न

चोपडा,दि.२८ ( प्रतिनिधी ) येथील विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी स्वरा विनीत हरताळकर हिने इयत्ता आठवी बी.टी.एस.अर्थात भारत टॅलेंन्ट सर्च परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्यामुळे तिला परीक्षा आयोजकांतर्फे विमान प्रवासाने इस्त्रो येथे अभ्यास सहलीसाठी तिची निवड झाली होती त्यानुसार आज तिची अभ्यास सहल इस्त्रो येथे पूर्ण होऊन ती सुखरूप पुणे विमानतळावर विमानाने पोहोचली. 

तिने केलेल्या कष्टाचे ,मेहनतीचे तिला हे एक सुंदर बक्षीस परीक्षा मंडळामार्फत मिळाले. त्यानिमित्त स्वरा व संपूर्ण परिवाराचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर विश्वस्त व मुख्याध्यापक नरेंद्र भावे, बी.टी.एस.परीक्षा जळगाव  जिल्हा समन्वयक राकेश विसपुते यांच्यासह संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ व पदाधिकारी, शिक्षकवृंद ,शिक्षकेतर कर्मचारीवृंद, पालकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने