ज्येष्ठ नागरिक संघ चोपडा तर्फे डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

 ज्येष्ठ नागरिक संघातर्फे  डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

 चोपडा,दि.२८(प्रतिनिधी)आपल्या बुद्धी - ज्ञानाने व द्रष्टया विचाराने भारताच्या अर्थ  धोरणाला नव्या आर्थिक उदारीकरणाची जोड देत देशाचा कायापालट तसेच जागतिक पटलावर अर्थव्यवस्थेत भारताचा अमीट ठसा उमटवित भारताला एका नवीन उंची वर नेणारे आर्थिक उदारीकरणाचे जनक ,विख्यात अर्थतज्ज्ञ व भारताचे सलग २ वेळा पंतप्रधान राहिलेले डॉ . मनमोहन सिंग यांना ज्येष्ठ नागरिक संघ चोपडा कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष विजय करोडपती , विद्यमान अध्यक्ष जयदेव देशमुख यांनी स्व .डॉ .मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले . यावेळी मनमोहन सिंग यांच्या द्रष्ट्या विचारांमुळेच भारताच्या अर्थव्यवस्थेला १९९१ नंतर कलाटणी मिळाली व भारतात आर्थिक सुधारणा झाल्यात असे त्यांच्या कार्या विषयी विजय करोडपती यांनी गौरवोद्गार काढत   त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली . या वेळी उपाध्यक्ष जे . एस् .नेरपगारे , कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील , कार्य .सदस्य गोविंदा महाजन व सचिव विलास पाटील सर खेडीभोकरीकर यां सह संघाचे सदस्य उपस्थितीत होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने