ना.श्री.गुलाबरावजी पाटील यांचे हस्ते गुर्जर दिशा दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन

 ना.श्री.गुलाबरावजी पाटील यांचे हस्ते  गुर्जर दिशा दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन 

चोपडा,दि.२९(प्रतिनिधी)९० च्या दशकातील गुर्जर समाजाचे मुखपत्र मासिक  गुर्जरदिशाचे तेव्हा जे प्रत्येक गावातील समाज बांधवांचे टेलिफोन नंबर असलेले गुर्जर दिशा कॅलेंडर निघायचे ते "तत्कालिन मोबाईल नसलेल्या काळात समाजातील मृत्यू घटनां वेळी गावोगावी आप्तांना निधन वार्ता कळवायला फारच उपयोगी सिद्ध व्हायचे " अश्या शब्दांत  ना. श्री गुलाबरावजी पाटील यांनी त्यांच्या शुभहस्ते २०२५ ची गुर्जरदिशा दिनदर्शिका प्रकाशन करतांना गत गुर्जर दिशा कॅलेंडर  संदर्भातील आठवणीस उजाळा दिला . 

यावेळी गुर्जर दिशा दिनदर्शिका संपादक विलास पाटील खेडीभोकरीकर यांनी गुर्जर दिशा दिनदर्शिका २० २५ मध्ये समाजातील धार्मिक , अध्यात्मिक , सामाजिक वास्तू , मंडळं , सामाजिक व्हॉटस् अप समूह  , विविध क्षेत्रातील समाज अभिमान इ . कॅलेंडर वैशिष्ट्यांबाबत  कॅबिनेट मंत्री समाज अभिमान श्री .गुलाब रावजी पाटील यांना माहिती दिली . या दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी गुर्जर संस्थान जळगांवचे विश्वस्त डी .बी. पाटील , श्री . गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील  , हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान जळगांवचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने