सुरेश बारेला खूनप्रकरणी उर्वरित संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी
चोपडा,दि.९(प्रतिनिधी)तालुक्यातील वैजापूर येथे झालेल्या सुरेश ओकार बारेला (रा. बढवाणी, ता. चोपडा) याच्या हत्या प्रकरणातील उर्वरीत आरोपींना तत्काळ अटक करा अन्यथा मयताच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचे निवेदन ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहे यावर जवळपास ५०आदिवासी बांधवांच्या सह्याआहेत.
निवेदनात नमूद केले आहे की,दि.०६/१२/२०२४ रोजी वैजापुर येथे कै. सुरेश ओंकार बारेला यांच्यावर खुनी हल्ला होऊन त्याच्यावर लाकडी दांडके , दगड, लाथे-बुक्के मारून त्यांचा खून करण्यात आलेला आहे,तसा गुन्हा आपल्या पोलिस स्टेशनला दाखल आहे, त्यात पोलिसांनी चांगली कामगीरी केलेली असून ११ आरोपींना अटकही केलेली आहे, परंतु सदर खुनाच्या गुन्ह्यात ११ पेक्षा जास्तीचे संशयित आरोपी आहेत ते सध्या मोकाट फिरत आहेत.तरी पोलिसांनी उर्वरीत आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केलेली आहे.
जर उर्वरीत संशयित आरोपी मोकाट राहीले तर कैः सुरेश ओंकार बारेला यांच्या परिवारास धोका निर्माण होवु शकतो असे स्पष्ट केले असून या निवेदनावर ओंकार मारसिंग बारेला परमेश महारु बारेला, नजीर सत्तार सिंग, जगन ओंकार बारेला , भिमसिंग मानसिंग बारेला, सत्तारसिंग बारेला ,चिमा बघी बारेला, केसराम जंजाळ बारेला, प्रकाश बारेला यांच्यासह जवळपास 50 आदिवासी बांधवांच्या सह्या आहेत.
