मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी अन् चोपड्यात भाजप युवा मोर्चा तर्फे जल्लोष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी अन् चोपड्यात भाजप युवा मोर्चा तर्फे जल्लोष

======================


चोपडा दि.७(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्याचे  २१ व्या  मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी  शपथ घेतल्यानंतर  चोपड्यात भाजपा युवा मोर्चा तर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. छत्रपती महाराजांना माल्यार्पण करून सामुहिक प्रार्थना केली तसेच यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्रीराम चंद्र भगवान की जय,तसेच लाडक्या बहीणींचा लाडका भाऊ ..देवा भाऊ देवा भाऊ अश्या अनेक घोषणानी परिसर दणाणून सोडला.

याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रावसाहेब पाटील,माजी पं स सदस्य बापुराव पाटील,रावेर लोकसभा संपर्क प्रमुख रविंद्र मराठे,माजी शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,तुषार पाठक, रणछोड पाटील,चंद्रकांत धनगर, धर्मदास पाटील,गोपाल पाटील,दिनेश जाधव, विनोद भोई, भरत मितावलीकर,गोपाल पाटील,भुषण महाजन,प्रकाश पाटील,विवेक गुजर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते देविदास कोळी, राहुल मराठे, यासह भाजप, शिवसेना शिंदे गट ,राष्ट्रवादी  अजित पवार गट कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने