चोपडा येथे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ वा महापरिनिर्वाण दिनानिमित अभिवादन
चोपडा दि.६(प्रतिनिधी)तालुका येथे दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा शहर व तालुक्याच्या वतीने तसेच समता सैनिक दल* यांच्या वतीने *महामानव बोधिसत्व प.पुज्य डॉ.बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन* कार्यक्रम दि.६ डिसेंबर २०२४ शुक्रवार रोजी ठिक.८.३० वा आयोजन करण्यांत आले होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बापूराव वाणे व शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ यांनी माल्यार्पण केले. त्रिशरण,पंचशील,बुद्धवंदना, भिमस्मृती,भिमस्मरण म्हणून वंदना करण्यांत आली.
सदर अभिवादन कार्यक्रमास जिल्हा संघटक हितेंद्र मोरे,सुदाम ईशी,सुनिल शिरसाठ,सुदाम करनकाळ, छोटू वारडे उपाध्यक्ष ,,मनोहर शिरसाठ,देवानंद वाघ,संजय अहिरे, भूरसिंग बाविस्कर,सुकदेव बाविस्कर, वसंत शिंदे,महेंद्र सोनवणे,विजय शंभरकर इत्यादी पदाधिकारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी,कार्यकर्ते,आजी माजी श्रामणेर ,बौध्दाचार्य,सर्व बौद्ध उपासक उपासिका बंधू भगिनी उपस्थित होते .