व्हाईस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्षपदी शाम जाधव यांची निवड
चोपडा दि.१९( वार्ताहर ) - जगात ४१ देशात आणि भारतात क्रमांक एकवर असणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ( रावेर विधानसभा मतदार संघ ) चोपडा येथील पत्रकार शाम जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
व्हाईस ऑफ मिडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सदरची निवड केली असून त्यांच्या स्वाक्षरीने नियुक्तपत्र विभागीय अध्यक्ष मिलिंद टोके यांनी शाम जाधव यांना सुपूर्द केले आहे.सदरच्या निवडी बद्दल संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के,प्रदेश कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर यांच्यासह अनेकांनी शाम जाधव यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.