कोळंबा येथील संजय पाटील सरांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार

 कोळंबा येथील संजय पाटील सरांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार

चोपडा दि.१९(प्रतिनिधी)बदलापूर जिल्हा ठाणे येथील प्रेरणा फाउंडेशन , प्रेरणा नाट्यमंडल या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कोळंबा येथील श्री गुरुदेव माध्यमिक विद्यालयातील श्री संजय पाटील सर प्रदान करण्यात आला

    संस्थेच्या अध्यक्षा प्रेरणा वैभव कुलकर्णी आणि वैभव कुलकर्णी यांनी त्यांच्या संस्थेमार्फत संजय पाटील सर यांना त्यांच्या उत्कृष्ट अशा कार्याबद्दल कोणत्याही प्रस्ताव विना हा पुरस्कार दिलेला आहे

प्रेरणा फाउंडेशन ही बदलापूर येथील एक सेवाभावी संस्था आहे जी गोरगरीब, अनाथ लोकांना मदत करते, त्यांची काळजी घेते. संस्थेमार्फत अनेक वेगवेगळे सामाजिक सेवाभावी कार्यक्रम वर्षभर प्रेरणाताई आणि त्यांची संस्था करीत असते.

    संजय पाटील सर हे ग्रामीण भागातील कोळंबा येथील गुरुदेव माध्यमिक विद्यालयात गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहेत. संजय पाटील सर गोरगरीब, होतकरु अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून सतत कार्य करीत असतात. त्यासाठी ते यु ट्यूब चॅनेल च्या माध्यमातून निशुल्क स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता या विषयाचे मार्गदर्शन करतात, विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन करतात. महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यात असणारे विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती परीक्षा देऊन शिष्यवृत्ती साठी पात्र झाले आहेत 

सरांना त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन प्रेरणा फाउंडेशन या संस्थेने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले आहे संजय पाटील विविध शिक्षक संघटनेत सुद्धा शिक्षकांसाठी कार्य करतात, तसेच सहकारी शिक्षक बंधू भगिनींना सुद्धा गणित विज्ञान विषयाबद्दल मार्गदर्शन करीत असतात

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने