जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचा भव्य मोर्चा .. ♦️दिव्यांग सेनेसह २० सामाजिक संस्था व संघटनांचा सहभाग ♦️ समस्यांचा निपटारा करण्याचे आयुष प्रसाद यांचे आश्वासन

 

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचा भव्य मोर्चा ..
♦️दिव्यांग सेनेसह २० सामाजिक संस्था व संघटनांचा सहभाग
♦️ समस्यांचा निपटारा करण्याचे आयुष प्रसाद यांचे आश्वासन

जळगाव दि.२०(प्रतिनिधी): दिव्यांगांच्या कल्याणासाठी जळगाव जिल्ह्यातील विविध दिव्यांग संस्था व संघटनांच्यावतीने नुकतेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे विविध  मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  मोर्चात जिल्ह्यातील  २०  सामाजिक  संघटनांनी सहभाग घेतला असून  १२००  दिव्यांग व्यक्तीं उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री विजय रायसिंग, वै. सा. का दिव्यांग अधिकारी माधुरी भागवत , दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालक एस. पी. गणेशकर हे मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी  यांनी जिल्हास्तरीय मागण्या सोडवण्याचे आश्वासन देऊन राज्यस्तरीय समस्यासाठी वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले.
सदर मोर्चात जिल्ह्यात स्वतंत्र दिव्यांग भवनाची निर्मिती करणे, दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत पद भरती करणे, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत दिव्यांगांच्या विकासासाठी ५% निधीची तरतूद करणे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात जिल्हा रुग्णालय परिसरात जागा उपलब्ध करून देणे, शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्राचा पुनर्विकास करणे,शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्रास अर्थसहाय्य करणे, दिव्यांगांना स्वतंत्र अंत्योदय शिधापत्रिका उपलब्ध करून देणे,दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी  गटई स्टॉलची योजना राबवणे, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणाऱ्या भत्तेत वाढ रणे, तालुकास्तरावर दिव्यांगांसाठी प्रवासी निवारा केंद्र स्थापन करणे, ग्रामविकास विभागाच्या २०१८  च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे,  आमदार विकास निधी अंतर्गत दिव्यांगांसाठी निधी उपलब्ध करून देणे, शासन स्तरावर दिव्यांग पुरस्कार योजना सुरू करण्यात यावा, समाज कल्याण विभागाच्या बीज भांडवल योजनेअंतर्गत बँकांचे विशेष सहकार्य मिळावे आदी मागण्या मांडण्यात आल्या.
याप्रसंगी दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन, सामाजिक संस्थेचे श्रीमती मीनाक्षी निकम, राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी, श्रीमती यमुनाताई अवकाळे, गणेश पाटील, भरत जाधव, राहुल कोल्हे, मुन्ना चौधरी,  बाळासाहेब  पाटील, जितेंद्र पाटील, रमजान तडवी , हितेश तायडे, ज्ञानेश्वर पाटील, चेतन तळेले, शेख शकील मुतालिक, प्रदीप चव्हाण, तसेच दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने