जळगाव जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेचा "स्वयंसिद्ध" एक्झिबिशन उत्साहात संपन्न
जळगाव,दि.२०(प्रतिनिधी) जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेचा महिला सशक्तीकरण समिती अंतर्गत एक नवीन स्वरूपाचा आगळा वेगळा मेळावा दि १९ डिसेंबर गुरुवार रोजी उत्सहाने संपन्न झाला
या मेळाव्याचे उदघाटन प्रदेश सह सचिव राधा जी झंवर यांच्या हस्ते & प्रमुख पाहुणे म्हणून या स्वयं सिद्ध समितीच्या संयोजिका रेखा जी मुंदडा & सहसंयोजिका शारदा जी कासट होत्या.
या वेळी हा मेळावा अति वेगळ्या पद्धतीने नियोजन करून एकाच छत खाली सर्व आवश्यक वस्तू ग्राहकाला मिळू शकतील असा प्रयत्न केलेला होता ..
यात विविध प्रकारचे आकर्षक कपडे, ओरनमेन्ट ज्वेलरी,मसाला,मुखवास, घरातील सजावटीचे साहित्य , सोबत विशेष सोबत खान्देशी व विविध खाण्याचे स्टॉल होते.
या उद्योगिनी मेला में मुख्य प्रायोजक आर सी बाफना ज्वेलर्स, सह प्रायोजक बुलढाणा अर्बन बैंक, पारस जी राका, भूषण जी थेपड़े, नरेंद्र जी तोतला, किशोर महाजन, हे होते,
या मेळाव्यास राज्याचे माहेश्वरी समाजाचे उपाध्यक्ष श्री केदार जी मुंदडा , जिल्हाध्यक्ष श्री बी जे लाठी सर , सचिव श्री योगेश कलंत्री, तहसील सभेचे सचिव रमन लाहोटी आणि विविध सन्माननीय सदस्यांनी भेट दिली .
जिल्हा माहेश्वरी संघटनेचे कार्यकारणीचे सर्व सदस्यांबरोबर अध्यक्ष सुमती नवाल , सचिव मनीषा तोतला , ममता राठी , ज्योत्स्ना लाहोटी, सुषमा झंवर पूनम मंत्री अमिता सोमानी, चित्रा मालपानी ,ममता काबरा, अर्चना मनियार, नीलिमा माहेश्वरी, सुधा काबरा, ललिता झवर ,सोबत सर्व सदस्यांनी उस्फुर्त पणे सहभाग नोंदविला ,