१८ जानेवारी २०२५रोजी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय परिक्षेसाठी प्रवेश पत्र प्राप्तीकरिता लिंक जाहीर

 १८ जानेवारी २०२५रोजी  होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय परिक्षेसाठी प्रवेश पत्र प्राप्तीकरिता लिंक जाहीर 

चोपडा,दि.२४ (प्रतिनिधी)  इयत्ता ५ वी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय ६,वी प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अॉनलाईंन अर्ज केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी पुढील लिंकवर https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard रजिस्ट्रेशन नंबर व आपली जन्म तारीख टाकून  परिक्षा पत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय जळगाव साकेगाव चे प्राचार्य आर.आर.खडारे यांनी केले आहे.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जवाहर नवोदय वि‌द्यालयातील इयता 6 वी च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात जुलै 2024 पासून झालेली आहे. प्रवेश परिक्षा अर्ज  पूर्वी प्रमाणे फक्त ऑनलाइन पद्‌धतीनेच भरण्यात आलेले आहेत. 

ही परीक्षा  ठरलेल्या वेळेवर म्हणजे दिनांक 18/01/2025 (शनिवार) रोजी निर्धारित केलेल्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर वेळ 11.30 से 1.30 वाजेपर्यंत होईल.तरी  

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा-2025 ची प्रवेशपत्रे वरील लिंकवर जाऊन डाउनलोड करता येतील, तरी वर नमूद केलेली लिंक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवा, जेणेकरून उमेदवार डाउनलोड करू शकतील. त्यांचे प्रवेशपत्र प्राप्त करता येतील असे प्राचार्य आर.आर.खंडारे यांनी कळविले  आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने