कर्ज वा खरेदी करतांना जागरूक व्हा - प्रा सुरेश कोळी
भडगाव दि.२४(प्रतिनिधी)- ग्राहक हा आर्थिक व्यवहार मध्ये महत्वाचा घटक आहे कोणतेही व्यवहार करतांना अमिषाना बळी पडू नका आज बाजारात गरजू लोकांच्या अडाणी पणाचं गैरफायदा लबाड लोक घेत असतात, बँक,विमा फायनान्स कंपन्या च्या नावाने ग्राहकांना फोन करून कर्ज साठी काही पैशाची मागणी करून लुबाडणूक करतात तसेच ऑनलाईन पार्सल आले असून त्यासाठी " apk, anydesk " डाउनलोड करायला लावतात व 5 रुपये चार्ज पाठवा असे सांगून फसवणूक करतात हे अँप म्हणजे आपली सर्व मोबाईल मधील माहिती, फोटो,बँक बॅलन्स पिनकोड त्यांना समजतात आपल्याला बोलण्यात ठेऊन आपल्या बँकेतून पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून घेतात तरी सर्व ग्राहकांनी व्यवहार करतांना जागरूक राहा " असे मार्गदर्शन पर विचार अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रा सुरेश कोळी यांनी मांडले,ते virtual hearing and digital access to customer justice या विषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले
तहसील कार्यालय आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवासी नायब तहसीलदार श्री सुधीर सोनवणे होते यावेळी नायब तहसीलदार संजय गांधी योजना श्री रमेश देवकर, निलेश बडगुजर, पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर अमृतकर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्य वरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले आज 24 डिसेंबर 2024 रोजी तहसील कार्यालय भडगाव ला राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास पत्रकार संघांचे नवनियुक्त अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पुरवठा लिपिक समाधान पाटील, तहसील कार्यालयातील कर्मचारी वृंद, स्वस्त धान्य दुकानदार, आशुतोष गॅस एजन्सी चे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर अमृतकर यांनी तर आभार प्रदर्शन चेतन पाटील यांनी केले