ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार घोषित
चोपडा,दि.१२(प्रतिनिधी) :येथील ज्येष्ठ पत्रकार व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते , विविध संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री अनिलकुमार द्वा. पालीवाल यांना 2025 चां राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
हा पुरस्कार नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था संघातर्फे जाहीर झाला असून श्री. अनिल पालीवाल यांचे सामाजिक व इतर क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनिय कार्याची दखल घेण्यात आलेली आहे.
हा पुरस्कार सोहळा रविवार, दि. ५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता रोटरी क्लब हॉल गंजमाळ, नाशिक येथे आयोजित आहे असे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र हेरापीडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे