32 वर्षानंतर हातेड हायस्कूल मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न..जुन्या आठवणींना उजाळा उपजिल्हाधिकारी उपस्थित

 32 वर्षानंतर हातेड हायस्कूल मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न..जुन्या आठवणींना उजाळा  उपजिल्हाधिकारी उपस्थित 


चोपडा दि.२६ (प्रतिनिधी) :जळगाव जिल्हा नूतन मराठा विद्या प्रसारक संस्थेमार्फत श्री शिवाजी हायस्कूल हातेड येथील माध्यमिक विभागात 1991- 1992 दहावीतील विद्यार्थ्यांचा हातेड हायस्कूल प्रांगणात दिनांक 25 /12/ 2024 रोजी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. तब्बल 32 वर्षानंतर वर्गमित्र एकत्र आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आगळा -वेगळा आनंद होता.शाळेचे माजी विदयार्थी चंद्रशेखर सोनवणे यांच्या संकल्पनेतून व्हाट्सअप ग्रुप तयार करून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री एल. एम. पाटील यांना सर्वानुमते देण्यात आले तर प्रमुख अतिथी माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे आणि टीडीएफ राज्य उपाध्यक्ष श्री आर.एच. बाविस्कर यांना करण्यात आले.याप्रसंगी -25पैशांची बोरं आणि 92 सालची पोरं* अशी घोषणा देऊन 10 वी तील 1992 या वर्षाला माजी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला.

याप्रसंगी सर्वप्रथम सर्व माजी  विद्यार्थ्यांमार्फत शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक श्री पी.सी. पाटील व पर्यवेक्षक पंजाबराव बाविस्कर यांना शाळेसाठी सरस्वतीची मूर्ती देण्यात आली. त्यानंतर शाळेचे दिवंगत शिक्षक व दिवंगत विद्यार्थी यांना उपस्थितीतांमार्फत भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. ईशस्तवन व सरस्वती पूजन दिपप्रज्वलन करण्यात आले.  माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित अध्यक्ष एल.एम.पाटील माजी आमदार दिलीपराव सोनवणे पीडीएफ राज्य उपाध्यक्ष आर.एच.बाविस्कर, जी. बी. सोनवणे, व्ही. एस. सोनवणे, एस. बी. सोनवणे,एम के सोनवणे, एस.एस. खाचणे, ए.बी.पाटील, व्ही. बी. बाविस्कर, ए.एन. सनेर, एस.बी. पाटील, यु.एच. बाविस्कर,पी. आर. पाटील, एस. आर. सोनवणे, पी. सी. पाटील, पंजाबराव बाविस्कर,एस. एच. सोनवणे, एच.एन. सोनवणे, शालिक पाटील, सुधीर भामरे यांचा सत्कार केला. तदनंतर महाराष्ट्र राज्याचे नामदार तथा शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे यांचे  स्विय सहाय्यक राहिलेले शाळेचे माजी विद्यार्थी तथा उपजिल्हाधिकारी *श्री महेंद्र रमेशराव पवार* यांचाही शाळेने व वर्ग मित्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सत्कार केला. याप्रसंगी शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करून शाळेप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केले . शाळेतील सर्व माजी विद्यार्थ्यांना ट्रॉफीसाठी अर्थ सहाय्य करणारे अभियंता तसेच कॉन्ट्रॅक्टर *समाधान सोनवणे* यांचा सन्मान करण्यात येऊन सोबतच मान्यवरांच्या हस्ते सर्व माजी विद्यार्थ्यांना देखील सन्मानित करण्यात आले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपला व्यक्तिगत  परिचय करून दिला.शाळेचे माजी विद्यार्थी तथा विद्यमान ग. स.संचालक योगेश सनेर यांनी देखील सर्व मान्यवरांना व सर्व माजी विद्यार्थी मित्रांना भेटवस्तू दिली त्यांचाही मान्यवरांनी सत्कार केला. वैद्यकीय क्षेत्रात एम.डी.एम.एस करणारे विद्यार्थ्यांचे पालक संजय भाऊराव पाटील,सुनील चव्हाण पाटील यांचाही सदर प्रसंगी गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थी रिदम्स ऑर्केस्ट्राचे संचालक सतिष बोरसे, माजी विद्यार्थी अनिल सनेर, महेंद्र पवार, संध्या शिंदे यांनी देखील सुरेल संगीताने उपस्थितांना मंत्र मुग्ध केले.संगीता कोतकर हिने अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत माजी सर्व विदयार्थी व शिक्षक यांच्याशी हितगुज साधले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व माजी विदयार्थ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यमान मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिल सनेर यांनी, तर सूत्रसंचालन चेतश्री सनेर आणि धनश्री सनेर यांनी व आभार प्रदर्शन भूपेश सोनवणे यांनी केले.

माजी विद्यार्थ्यानी केली एकमुखी मागणी -शाळेचे नाव श्री शिवाजी हायस्कुल हातेड असे असून त्याऐवजी *छत्रपती श्री शिवाजी हायस्कुल हातेड* असे नामकरण करावे आणि यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा अशी विनंती व्यासपीठाकडे केली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने