डाॅ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
चोपडा ( प्रतिनिधी )मुंबई सायन्स टिचर असोसिएशन आयोजित डाॅ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा 2024-25 या परिक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला यात विवेकानंद विद्यालय(माध्यमिक)चोपडा येथील इयत्ता सहावी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभागा घेतला होता.ही परीक्षा लेखी,प्रात्यक्षिक,तोंडी अशा तीन स्तरावर आयोजित केली जाते. यातील लेखी परिक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत खालील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी आपले स्थान मिळवून विज्ञान तंत्रज्ञान या विषयाचे आपले कौशल्य सिद्ध केले आहे.
लेखी परीक्षा (Theory Paper)
पास आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी मानस नरेंद्र पाटील ,गीत अमित हरताळकर इयत्ता-6 वी, स्वरा विनित हरताळकर,कोमल जगदीश पाटील इयत्ता -9 वी तसेच लेखी परीक्षा पास विद्यार्थी विहान अमोल मोदी,स्वयंप्रभा योगेश पाटील,नक्षत्रा योगेश सोनवणे,झिनत जावेद तडवी, पुर्वजा भुपेन्द्र पाटील इ. 6 वी,सानवी अतुल पाटील,कल्पेश कमलाकर पाटील,वरद अजय पाटील,प्रज्ञेश ज्ञानेश्वर निकम,मयुरेश सुखदेव शिंदे,ऋतुजा किशोर पाटील इ.9 वी
सर्व सहभागी आणि यशस्वी विद्यार्थी ,त्यांच्या आई-बाबा व कुटुंबियांचं हार्दिक अभिनंदन आणि कौतुक संस्थेचे अध्यक्ष डाॅ.विकास हरताळकर,माजी अध्यक्ष डाॅ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्यामभाई अग्रवाल,सचिव-आदरणीय अँड. रविंद्र जैन, सहसचिव डाॅ.विनित हरताळकर,विश्वस्त व शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे सर.प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते,
ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.जी.पाटील,इंग्लिश मेडीअम मुख्याध्यापिका सुरेखा मिस्त्री तसेच संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वर्ग यांनी केले सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.