आधार संस्थेचा भारत सरकारच्या 'बाल विवाहमुक्त भारत' ला पाठिंबा जाहीर ..जिल्हा तालुका प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचा पुढाकार

 

आधार संस्थेचा भारत सरकारच्या 'बाल विवाहमुक्त भारत' ला पाठिंबा जाहीर ..जिल्हा तालुका प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचा पुढाकार



जळगाव,27 नोव्हेंबर 2024(प्रतिनिधी):केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे देशव्यापी बाल विवाहमुक्त भारत' मोहिम सुरु केल्याने जिल्हा ,तालुका प्रशासनाने बालविवाहा विरोधात रॅलीचे, शपथविधी समारंभांचे आयोजन केले कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विधी सेवा प्राधिकरण सचिव  न्यायाधीश सय्यद , जिल्हा  व तालुका प्रशासनचे अधिकारी यानी जळगाव 'जिल्हा बाल विवाह मुक्त करणार" असा संकल्प केला.आधार बहुउद्देशीय संस्था ही जस्ट राइ‌ट्‌स फॉर चिल्ड्रन या देशभरातील मुलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या 250 हुन अधिक एनजीओ भागीदारांच्या राष्ट्रीय युतीचा एक भाग आहे

विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आज केंद्र सरकारने बालविवाह विरोधी 'बाल विवाह मुक्त भारत' मोहिमेचा शुभारंभ केला असतानाच जिल्हा प्रशासनाने सु‌द्धा जिल्ह्यात आधार बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने रॅली शपथविधी समारंभ आयोजित करण्याची तयारी केली आहे. जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन्स (जेआरसी) है देशभरातील 400 हुन अधिक जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या 250 पेक्षा जास्त बाल संरक्षण एनजीओ भागीदारांचे राष्ट्रीय नेटवर्क आहे आणि आधार बहुउद्देशीय संस्था ही त्या युतीचा भागीदार आहे

जळगाव येथील श्रीराम विद्यालयामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव माननीय न्यायाधीश सय्यद सर यांनी मार्गदर्शन केले आणि सामूहिक शपथ दिली .माननीय सय्यद साहेब सचिव जिल्हा प्राधिकरण यांनी जिल्ह्यात कुठेही अशी घटना घडत असेल तर जिल्हा प्राधिकरणाशी तसेच शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन केले केले


जिल्हाभरात शेकडो ग्रामस्थ, ग्रामपंचायती, बाल विवाह संरक्षण अधिकारी (सी.एम.पी.ओ), आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि महिला यांनी शपथ घेऊन कार्यक्रमात सहभाग घेतला.27 नोव्हेंबर रोजी बालविवाह निर्मूलनासाठी महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी बाल विवाह मुक्त भारत मोहिम जाहीर केली होती आणि तिला प्रतिसाद म्हणून जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. त्यांनी देशातील सर्व ग्रामपंचायती आणि शाळांना बालविवाह विरोधी शपथ दिली असून ही मोहिम 25 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा केली जात आहे. बालविवाहाची माहिती देणे सोपे जावे म्हणून एका राष्ट्रीय पोर्टलचे अनावरण मु‌द्दा यावेळी करण्यात आले.

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सरांनी व्हिडिओ क्लिप द्वारे सर्व जिल्हा वासियांना  जळगाव जिल्ह्यात बालविवाह थांबविण्याचे आवाहन केले तसेच आधार संस्थेने ज्या विभागात बालविवाह होतात त्याचा एक सर्वे करून तेथील सरपंच ,पोलीस पाटील यांच्या कार्यशाळा आयोजित कराव्या व गावातील 14 ते  18 वर्षाच्या वयोगटातील मुलींची माहिती घेऊन त्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे सूचना कार्यशाळेतून केला जातील असे सांगितले


बाल विवाह मुक्त भारत मोहिमेस माननीय  न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सय्यद सर,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रफिक तडवी, संपूर्ण जिल्हा  व तालुका प्रशासन यांचेकडून पुढाकार घेऊन या देशव्यापी मोहिमेची कार्यवाही करणेत येत आहे.

 वास्तविक स्वरूपात मोहिमेचे काम लवकर कसे होईल, याविषयी बोलताना आधार संस्था अध्यक्ष डॉ. भारती पाटील,संचालक रेणू प्रसाद म्हणाले, "बालविवाह प्रतिबंध बाबत जन जागृ‌ती करण्यासाठी, असे कोणतेही विवाह रोखण्यासाठी आम्ही सरकारी अधिकारी आणि स्थानिक प्रमुख यांच्यासमवेत जिल्हयात काम करीत आहोत आणि त्यासोबतच सरकारच्या या मोहिमेमुळे या लढ्‌यालां ऊर्जाआणि पाठबळ लाभणार आहे. अखेर बालविवाह संपुष्टात आल्याने इतकी वर्षे आम्ही ज्या लढाईत होतो ती संपण्याच्या मार्गावर आहे आणि हे पाहणे आम्हाला अत्यंत समाधान देऊन जाणारा क्षण आहे. बाल विवाहाच्या गुन्ह्या मध्ये भारत गप्प बसणार नाही आणि प्रत्येक मुलाला हक्काचे बालपण मिळावे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, हे भारताने जगाला दाखवून दिले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने