नगर वाचन मंदिराच्या विविध समित्यांची निवड
चोपडा दि.२७(प्रतिनिधी)- येथील तालुका वाचनालय नगर वाचन मंदिराच्या विविध समित्यांची रचना करण्यात आली.त्यात सांस्कृतिक समिती चेअरमन उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुळकर्णी,ग्रंथ समिती चेअरमन श्रीकांत नेवे,ग्रंथ गणना समिती चेअरमन प्रभाकर महाजन यांची निवड करण्यात आली.
तसेच कार्यकारी मंडळावर स्वीकृत सदस्य म्हणून अविनाश कुलकर्णी व माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख यांची निवड करण्यात आली.यावेळी अध्यक्ष आशिष गुजराथी, कार्यवाह गोविंद गुजराथी, सहकार्यवाह डॉ परेश टिल्लू,ॲड. अशोक जैन, रजनी सराफ, अवधूत ढबु, धिरेंद्र जैन, विलास पाटील आदी उपस्थित होते.