चोपडा विधानसभा मतदारसंघात 63 टक्के मतदान ..९ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद.. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरूच.आता निकाल २३ रोजी .. निवडणूक ड्युटीवरील बीएलओ लक्ष्मीकांत वासुदेव पाटील यांचा अपघाती मृत्यू
चोपडा दि.२०(प्रतिनिधी):आज दि.20/11/2024 रोजी राज्यभर विधानसभा निवडणूक 2024साठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. चोपडा विधानसभेसाठी सायंकाळी ८:००वाजे पावेतो ६३ % मतदान शांततेत पार पडले असून महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त आघाडी घेतली असून लोकशाही बळकटीसाठी जोरदार पाऊल उचलल्याचे चित्र होते.आता मतदारांची मते पेटीत कैद झाले असून उमेदवारांचे भाग्य येणा-या शनिवारी 23 नोव्हेंबर२०२४ रोजी खुलणार आहे.कोण निवडून येणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून असून माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढत आहेत तर उबाठा चे उमेदवार मशाल चिन्हावर प्रभाकर गोटू सोनवणे यांच्यासह अन्य ७उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले असून निकाल शनिवारी असल्याने एकाला बजरंग बलीची ताकद प्राप्त होऊन विधानसभेच्या खुर्ची लाभणार आहे तर ८ जणांना शनि महाराज वरदान प्राप्ती वर समाधान मानावे लागणार आहे.दरम्यान प्रशासनाकडून मतदान करणाऱ्यासाठी अनेक प्रकारे जनजागृती केली गेली परंतु अनेक गावांमध्ये अनेक मतदाराचे नावच मतदार यादीत दिसून आले नसल्याने अनेक मतदार नाराज झाले. आणि त्यांना मतदाना पासून वंचित राहावे लागल्याने नाराजीचा सूर उमटला. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू राहणार असल्याचे प्रशासकिय सुत्रांनी सांगितले. बुधगाव केंद्रावरून निवडणूक ड्युटी आटोपून घरी जाणाऱ्या बीएलओ लक्ष्मीकांत वासुदेव पाटील यांचा रस्त्यातच अपघातात मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.
रात्री ८:००वाजे पावेतो ६३%मतदान
चोपडा विधानसभा मतदारसंघात 337 केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया शांततेत संपन्न झाली. यावेळी 63 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. 38 क्षेत्रांमध्ये विभागलेल्या या मतदारसंघात जवळपास सर्वच मतदारसंघात सकाळी मतदारांचा कल कमी होता मात्र वेळेसोबत नंतर मतदानाचा टक्का वाढत गेला. मतदानाची प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या मतदान साहित्य स्वीकृती केंद्रात मतदान यंत्रे आणि साहित्य जमा करून घेण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या वतीने अत्यंत सुटसुटीत आणि उत्तम नियोजन केल्याने आलेल्या पथकांची धावपळ टळली. कमी वेळात,कमी श्रमात मतदान साहित्य स्वीकारले जावे यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीचे सर्व कर्मचारी आणि पथकांनी कौतुक केले.
तालुक्यात *तांदळवाडीत* 75.37%, दोंदवाडे 66% तर निमगव्हाण येथे 72.20% मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झाले.तर खर्डी चे* मतदान बुथ १ वोटीग 404 झाले बुथ क्र 2 वोटीग 350वडती येथे* 74:95 / मतदान झालेअनवर्दे खु* 1065 पैकी ९०० झाले आहे.बुधगाव बुथ क्रमांक* १) २७६ मध्ये ८४७ पैकी ४४९२) २७७ मध्ये ९९२ पैकी ६४६एकुण १८३९ पैकी १०९५एकुण टक्केवारी ५९:५४ टक्के*मजरेहोळ गावात* 70/. टक्के मतदान झाले.*वर्डी येथे* ६५४७ पैकी ४४५४ मतदान झालं आहे वेले-आयतवाड* येथे वार्ड नं.1-(335) ,वॉर्ड नं.2 (328)वॉर्ड नं.3(597)असे एकुण 1259 मतदान झाल्याचे समजते.*हातेड खुर्द* येथे बुथ no .256 मतदान 710 तरबुथ no 257 मतदान 865एकुण मतदान 1575 एवढे झाले आहे.
*या प्रशासकीय अधिकारींनी घेतली मेहनत*
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसिलदार सचिन बांबळे, निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील, यांच्यासह सर्व नायब तहसीलदार सर्व विभागांचे नोडल अधिकारी विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.