प्रचार तोफा थंडावल्या ..पोस्टर्स काढा ..38 सेक्टर अधिकारी व 14 मायक्रो ऑब्झर्वर ठेवणार 52 केंद्रांवर कडी नजर.. मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज.. 23 रोजी मतमोजणी दुपारपर्यंत निकालाची शक्यता

 प्रचार तोफा थंडावल्या ..पोस्टर्स काढा ..38 सेक्टर अधिकारी व 14 मायक्रो ऑब्झर्वर  ठेवणार 52 केंद्रांवर  कडी नजर.. मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज.. 23 रोजी मतमोजणी दुपारपर्यंत निकालाची शक्यता 

♦️३३७ मतदान केंद्रावर शांततेत मतदान करा निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांचे आवाहन

♦️ज्या दिव्यांगांना घरापासून मतदान केंद्र पर्यंत आणायचे असेल अशांसाठी स्वतंत्र वाहनांची व व्हिलचेअर ची व्यवस्था 

♦️198 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग होणार असून निवडणूक आयोगाचे थेट लक्ष

♦️मोबाईलची रेंज नसणाऱ्या 9 शॅडो मतदान केंद्रावर ऑब्झर्वर ठेवणार लक्ष

 ♦️मतदानाच्या दिवशी सकाळी 5.30 वाजता मतदान केंद्रांवर होईल मॉक पोल 

♦️सैन्य दलातील 507 मतदारांसाठी दोन टेबलचे नियोजन 

♦️मतदान यंत्रे ठेवलेला स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनाही थांबण्याची मुभा 

♦️उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी  21 रोजी दुपारी स्क्रूटीनी होणार

चोपडा दि.१८(प्रतिनिधी) : 10 चोपडा (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी दि. 20 रोजी होऊ घातलेल्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून दि. 18 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आचारसंहिता संपल्यानंतर उमेदवारांचे कार्यालय, त्यांची वाहने, वाहनांवर लावलेली पोस्टर्स शहरात किंवा ग्रामीण भागात लावलेली पोस्टर्स काढणे आवश्यक आहे. हे सर्व पोस्टर्स काढून जमा करावीत. जाहीर प्रचार पूर्णपणे बंद झाला असल्याने पूर्ण 337 मतदान केंद्रांवर शांततेत मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन पत्रकार परिषदेतून निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी केलेले आहे.दिनांक १८ रोजी तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतून दिलेली आहे. 

 चोपडा विधानसभा मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही.एकूण 337 मतदान केंद्रांपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर म्हणजे 198 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग होणार असून निवडणूक आयोग थेट 198 मतदान केंद्रांवर मतदान कसे सुरु आहे यावर लक्ष ठेवणार आहे. विधानसभेसाठी 38 सेक्टर अधिकाऱ्यांकडून व 14 मायक्रो ऑब्झर्वर कडूनही 52 मतदान केंद्रांवर चिकित्सक लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच चोपडा तालुक्यात तीन तर यावल तालुक्यात सहा असे एकूण नऊ मतदान केंद्रांवर मोबाईलची रेंज नसते त्या ठिकाणी शॅडो मतदान केंद्रे म्हणून मायक्रो ऑब्झर्वर लक्ष ठेवणार आहेत. यापूर्वी दोन प्रशिक्षणे अतिशय उत्साहात मतदान कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलेले आहेत. मतदानासाठी मतदान यंत्रांचे तीन वेळा रँडमायजेशन केलेले आहे. या सर्व मतदान यंत्रांवर मतपत्रिका लावणे,त्यात 1000 मतदान करणे हे सर्व उमेदवारांसमक्ष कार्य केलेले आहे. दि. 20 रोजी सकाळी 5.30 वाजता मतदान केंद्रांवर मॉक पोल होईल. तर सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदान झाल्यानंतर  मतदान यंत्रांसह सर्व साहित्य हे स्वीकारून मतदान यंत्र हे महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या क्रीडा संकुलामध्ये सील केले जाणार आहेत. या मतदान केंद्रांच्या स्ट्रॉंग रूम शेजारी स्थानिक पोलीस, राज्य पोलीस आणि सीआरपीएफ च्या जवानांची देखरेख असणार आहे. या मतदान यंत्रे ठेवलेला स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनाही थांबण्याची मुभा आहे.किंवा प्रतिनिधी त्या ठिकाणी थांबू शकतात. 

यापूर्वी 70 दिव्यांग की, जे अंथरुणाला खिळून होते अश्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांचे मतदान झालेले आहे. उर्वरित दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था केलेली असून ज्या दिव्यांगांना घरापासून मतदान केंद्र पर्यंत आणायचे असेल अशांसाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था ही केलेली आहे. त्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केलेली आहे. चोपडा तालुक्यातील 1033 मतदान कर्मचारी हे बाहेर निवडणुकीच्या कर्तव्यासाठी जाणार असल्याने त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेट ची व्यवस्था केलेली आहे. त्यापैकी 750 कर्मचाऱ्यांचे मतदान झालेले असून उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी दिनांक 19 पर्यंत तहसील कार्यालयात मतदानासाठी व्यवस्था केलेली आहे. 

दिनांक 21 रोजी स्क्रूटीनी होणार आहे. सध्याच्या विधानसभेसाठी मतदान करताना काही तक्रारी आहेत का? काही अधिक सुधारणा करता येईल का? त्यासाठी उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी दिनांक 21 रोजी दुपारी स्क्रूटीनी होणार आहे. 

 दिनांक 20 रोजी होणाऱ्या मतदानासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख 31 हजार 384 मतदारांमध्ये एक लाख 67 हजार 801 पुरुष मतदार तर एक लाख 63 हजार 580 स्त्री मतदार आणि तीन मतदार हे ट्रांसजेंडर म्हणून असे एकूण तीन लाख 31 हजार 384 मतदारांची संख्या असल्याचेही पाटोळे यांनी सांगितले.

तसेच दि. 23 रोजी याच क्रीडा संकुलामध्ये मतमोजणी होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेतून निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी दिली. 

तसेच मतमोजणीसाठी 21 टेबल ची व्यवस्था केलेली असून त्यात 14 टेबलवर मतदान यंत्रातील मतमोजणी होणार असून पाच टेबलवर पोस्टल बॅलेट ची मोजणी होणार आहे. तर सैन्य दलातील 507 मतदारांसाठी दोन टेबलची अशी एकूण 21 टेबल ची व्यवस्था केलेली आहे. तर मतमोजणीच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत अंतिम निकाल येईल. असेही निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने