चोपडा विधानसभा शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा “नामनिर्देशन अर्ज” शिवसेना नेते श्री.गुलाबराव पाटील व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल...
चोपडा दि. 29(प्रतिनिधी):“महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024” अनुषंगाने चोपडा विधानसभेसाठी “शिवसेना व महायुती” चे अधिकृत उमेदवार प्रा .श्री. चंद्रकांत सोनवणे यांनी आज शिवसेना नेते श्री.गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, माजी आमदार सौ.लता सोनवणे तसेच जिल्ह्यातील भाजपा, शिवसेना व महायुती प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आपला "नामनिर्देशन अर्ज"तहसिल कार्यालय, चोपडा येथे सादर केला.
यावेळी शिवसेना नेते श्री.गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व महायुती पदाधिकारी यांनी "भव्य विजय संकल्प रॅली"* मध्ये सहभागी होऊन, सभेमध्ये उपस्थित जनसागरास संबोधुन प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी महायुती उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी, प्रत्येक बुथवर जास्तीतजास्त मतदानसाठी प्रयत्न करण्याचे यावेळी आवाहन केले.
निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी गौरव चंद्रकांत सोनवणेयांचेही नामांकन दाखल केले.
सकाळी ११:००वाजेपासूनच उनपदेव,पांढरी, कुंड्यापानी,पानशेवडी,अडावद, धानोरा,वरगव्हाण,बिडगाव,मोहरद वर्डी, लोणी पंचक, अकुलखेडा चहार्डी,लासुर,घोडगाव,वेळोदे,विटनेर अनवर्दे खुर्द, बुधगाव,हातेड,चुंचाळे,चौगाव,धुपेखुर्दे,विचखेडा,घाडवेल,विरवडा,उत्तमनगर,कर्जाणे,देवगाव,पारगाव,उर्मी,सत्रासेन,देवगड,देव्हारी,गलंगी ,कुरवेल, धनवाडी,संपुला, धनवाडी,कोळंबा, यासह बहुतेक गावातून तसेच यावल तालुक्यातूनही आणि शहरातील विविध कॉलनी भागातील भाजप, शिवसेना, रिपाइं गटाचे कार्यकर्ते व तरुण वर्ग प्रचंड मोठ्या संख्येने आनंदीबाई भवानी मंदिराजवळ जमले.त्यानंतर तिथून आशाटाकी ,बडगुजर गल्ली कडून थेट तहसील कार्यालयावर हजारोंच्या संख्येने गर्दी येऊन धडकली असता पोलिसांनी काही अंशी ससेहोलपट झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्याकडे नामांकन दाखल करण्यात आले.यावेळी प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या समवेत मंत्री रक्षाताई खडसे, मंत्री गुलाबराव पाटील, आ.लताताई सोनवणे,जेडीसीसी बॅंक संचालक तथा उद्योगपती घनःश्याम भाई अग्रवाल,भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील,कृउबा सभापती नरेंद्र पाटील, एम्.व्ही.नानापाटील , डॉ.अमृता सोनवणे,सागरभाऊ ओतारी, विकास पाटील, सुनील बरडिया, युवा कार्यकर्ते मजहरभाई, कॉन्टॅक्टकर गयासोद्दीन शेख,यासह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.