हवालदिल शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी कापसाला ११ हजारांचा भाव द्या.. अन्यथा टॉवर चौकात अंगावर पेट्रोल टाकण्याचा गर्जना शाखेचा इशारा

 हवालदिल शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी कापसाला ११ हजारांचा भाव द्या.. अन्यथा टॉवर चौकात अंगावर पेट्रोल टाकण्याचा गर्जना शाखेचा इशारा 


जळगाव दि.३०(प्रतिनिधी):यंदा अति पावसाने बळी राजा हवालदिल झाला असून पिके नुरती नष्ट झाल्याने  पोट भरण्या इतपत धान्य व कापूस हातात राहीला असून त्यालाही योग्य भाव नसेल तर जीवन जगावे कसे?असा प्रश्न करीत अनेक शेतकऱ्यांनी गर्जना शाखेकडे धाव घेऊन कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला असता ह्दय पिटवून टाकणाऱ्या आक्रोशा विरुद्ध निद्रिस्त शासनाला जागे करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ सोनवणे यांनी अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेऊ अशा भयावह आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.दि.१७/११/२०२४ रोजी टावर चौकात  शाखेचे अनेक कार्यकर्त्ये सहभागी होणार असून शासनाने कापसाला ११हजार रूपये क्विंटल व शेतमालाला योग्य भाव द्यावा अशी मागणी करीत जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब लक्ष घालावे शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नमूद पत्रकातून त्यांनी स्पष्ट केले आहे की,गेल्या अनेक दिवसापासून बळीराजाच्या व शेतकऱ्याच्या कापुस, सोयाबीन, मका व इतर पीके अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी राजा  आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची महाराष्ट्रात व जळगांव जिल्ह्यात आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ झालेली दिसत आहे. त्यातच जे काही बळीराजाच्या पदरात पडणार आहे त्या शेतीमालाला केंद्र शासनाने व महाराष्ट्र शासनाने तसेच राज्यपाल महोदयांनी त्वरीत भाव द्यावा व त्वरीत पाऊले उचलून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा दि. 17/11/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जळगांव येथील टॉवर चौकात पेट्रोल स्वतःचे अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेऊन सत्याग्रह करण्यात येईल असा ठाम निर्धार त्यांनी केलेला आहे . तरी शासनाने त्वरीत लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा व चर्चा करावी. या आंदोलनात अनेक शेतकरी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती  गर्जना अध्यक्ष सुभाषभाऊ सोनवणे यांनी पत्रकाद्वारे दिलेली आहे. 

या आंदोलनात  राजेंद्र चौधरी, सचिन सोनवणे, डॉ. एन. के. जाधव, रायसिंग भिल, सोपान माळी, कैलास दांडगे, विलास पाटील, बापु विनायकराव पाटील, बापुराव शेळके, दत्तुभाऊ विखे, रमेश साळुंखे, राजु चित्ते, सोपान लेहेकर, ज्ञानेश्वर सोनवणे, लक्ष्मण जाधव, एकनाथ जाधव, बाबुलाल पांचाळ, विनायक भिसे यांचेसह इतर कार्यकर्ते मोठ्या सहभागी होणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने