रोटा किड्स व रोटरीतर्फे रस्ताकडेच्या पालांवरील बालकांना फटाके संच वाटप
चोपडा दि.३१( प्रतिनिधी)रोटरीची लहान बालकांची शाखा रोटा किड्स चोपडा तसेच रोटरी क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने चोपडा शहरातील रस्त्यांच्या कडेला तात्पुरत्या झोपडी वजा पालांवर राहणाऱ्या बालकांना प्रकाश पर्व अर्थात दिवाळीचे एक वैशिष्टय असलेल्या फटाक्यांचा आनंद घेता यावा या उद्देशाने दिवाळी फटाके बालानंद प्रकल्प घेण्यात आला . यात विठ्ठल मंदिर नारायण वाडी , ओमशांती केंद्र , गरताड रस्ता , दूधसंघ केंद्र यावल रोड तसेच रोटरीभवन परिसर , नागलवाडी रस्त्याकडेची उभारलेली तात्पुरती पालं यातील ६० बालकांना (१० भुईचक्र , ५कोठी, ४फुलबाजे डब्या, ५ प्रकाशतारा , ५ तडतडी फटाके , १ फटाका थैली , बंदूक - १०टिकली रोल अशा फटाका प्रकारांचे ) फटाका संच रोटा किड्स पदाधिकारी - व रोटरी सदस्यांच्या आर्थिक सहयोगातून वाटप करण्यात आले . या प्रसंगी रोटा किड्स प्रकल्प प्रमुख अन्वी जैस्वाल , रोटा किड्स अध्यक्षा आरोही पाटील , सचिव - रुचिता वाघ , कोषाध्यक्ष दर्श पोतदार रिशान व रिहान बोरोले , रोटरी प्रकल्प प्रमुख विलास पाटीलसर खेडीभोकरीकर, प्रेसिडेंट प्राचार्य ईश्वर सौंदाणकर , सचिव भालचंद्र पवार , सहसचिव संजय बारी , डॉ .नीता जैस्वाल ज्येष्ठ रोटेरियन एम .डब्ल्यू पाटील , व्ही .एस .पाटील , पंकज बोरोले ,चेतन टाटिया , प्रवीण मिस्त्री , डॉ.प्रफुल्ल पाटील,समाधान वाघ आदी उपस्थित होते .
दिवाळीत फटाके संच मिळाल्या बरोबर उत्सुकतेने फटाका संच डबे उघडून बघतांना मिळालेल्या फटाक्यांचा पालांवरील बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद रोटा किड्स व रोटरी सदस्यांना समाधान देणारा होता .