चोपडा तालुक्यात भाजपा जनजाती गौरव यात्रेस प्रारंभ..

 चोपडा तालुक्यात भाजपा जनजाती गौरव यात्रेस प्रारंभ..


चोपडा,दि.२ (प्रतिनिधी)आज दिनांक 02/10/2024 रोजी चोपडा तालुक्यातील मालापुर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित जनजाती गौरव यात्रा निमित्त भाजपा अनु जमाती मोर्चा जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष श्री मगन बाविस्कर व यावल मंडळ भाजपा प्रभारी श्री प्रदीप पाटील यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा* यांच्या प्रतिमेची पूजन करून जनजाती गौरव यात्रेची  सुरुवात करण्यात आली .

यावेळी श्री धनंजय शेरकर विभाग संघटन मंत्री (ABVP), श्री दिपक बाविस्कर सरचिटणीस भाजपा चोपडा शहर,  श्री भावीन  पाटील जिल्हा संयोजक (ABVP),   श्री मुकेश बडगुजर चोपडा शहर मंत्री, श्री पवन पाटील कार्यकर्ते व  गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने