समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून शिवाजी चौकात स्वच्छता

 समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून शिवाजी चौकात  स्वच्छता 

चोपडा,दि.२ ( प्रतिनिधी)आज दि. 2 ऑक्टोबर 2024 रोजी "राष्ट्रपिता महात्मा गांधी" यांच्या जयंती निमित्ताने "स्वच्छता हिच सेवा" या मोहिमेअंतर्गत भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील "राष्ट्रीय सेवा योजना" विभागाच्या वतीने "स्वच्छ भारत दिवस" साजरा करण्यात आला.   यानिमित्ताने नगरपरिषद, चोपडा येथील परीसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील परिसराची स्वच्छता करण्यात आली. 

      या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये नगरपरिषद येथील काही कर्मचारीही सहभागी झाले होते. तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, डॉ. संबोधी देशपांडे( कार्यक्रम अधिकारी), डॉ. उत्तम सोनकांबळे( सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने